अनाथांचा' कॅप्टन! इंदापूरचे धरमचंद गिरीधारीलाल लोढा 'अनाथ सेवा' क्षेत्रातील 'राज्यस्तरीय रत्न' पुरस्कार..! प्रधान
इंदापूर :- आपल्या आगळ्यावेगळ्या 'समाज सेवेच्या' शैलीसाठी प्रसिद्ध असलेले माननीय श्री. धरमद गिरधारीलाल लोढा यांनी पुन्हा एकदा 'मोठा धमाका' केला आहे. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे, आणि तेही त्यांच्या 'अनाथ सेवा' क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी!आपली 'अनाथ सेवा' फक्त नावापुरती मर्यादित न ठेवता, ती 'कृती'तून कशी उतरवायची, हे लोढा पप्पा यांनी जगाला दाखवून दिले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाने आणि अनाथांच्या मनातील 'आनंद' फुलवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी त्यांना हा सन्मान मिळवून दिला आहे. पुरस्कार स्वीकारताना लोढांचा 'तो' आत्मविश्वासाने भरलेला फोटो पाहून अनेकांना त्यांच्या सेवेची खरी 'ताकद' समजली.
या पुरस्कारामुळे केवळ लोढा पप्पा नाही, तर संपूर्ण 'इंदापूर' तालुक्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली गेल्याने आता इंदापूरचे नाव 'समाज सेवा' क्षेत्रातही आदराने घेतले जाईल. अनाथांच्या 'मदत'साठी नेहमीच धावून येणारे लोढा साहेब आता 'खरे रत्न' म्हणून मिरवताना दिसत आहेत.
आपण सर्वांनी लोढा साहेबांचे मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही 'अनाथ सेवे'च्या मार्गावर थोडे का होईना, चालण्याचा प्रयत्न करूया!
टिप्पण्या