इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित, श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. जल्लोष चिमुकल्यांचा, आविष्कार कलागुणांचा'या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. अविनाश पाणबुडे आणि प्राचार्य जीवन सरवदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून विविध कलागुणांचे सादरीकरण केले. चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून महत्त्वाचे सामाजिक संदेश दिले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर शहर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले:प्राचार्य जीवन सरवदे (अध्यक्ष, आय कॉलेज), ॲड. गिरीश शहा...
SHIVSRUSTHI NEWS