मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी*

1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती मुंबई, दि. 30 (रानिआ): नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही.  राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद 16 अन्वये नगरपरिषद व नगरपंचा...

सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार अनिताताई खरात यांना प्रधान

पुणे जिल्ह्यातून सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया मराठी न्यूज यांच्यातर्फे दरवर्षी ज्येष्ठ गीतकार व गायक आप्पा पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार यावर्षी इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिताताई नानासाहेब खरात यांना प्रदान करण्यात आला, सामाजिक शैक्षणिक गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना व युवकांना प्रत्येक वेळी पुढे होऊन मदत करणारी व्यक्ती म्हणजे अनिताताई खरात या असून आम्ही सर्वे करत असताना त्यांचं नाव प्रकर्षाने पुढे आले त्या दृष्टीने आम्ही त्यांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करत आहोत असे सिटी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .  पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन अनिताताई खरात यांचा गौरव करण्यात आला, यावेळी तुकाराम सुतार ,विष्णू कुमार देशपांडे ,आप्पा पांचाळ, ॲड नितीन कदम तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर , कलाकार उपस्थित होते.     पुरस्कारला उत्तर देताना अनिताताई म्हणाल्या की सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया न्यूज यांनी जिल्ह्यातून जो माझ्यावर विश्वा...

नव दांपत्यानी इंदापूरकरांना केले मतदान करण्याचे आव्हान

इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक समावेशक सुलभ आणि सहभागी करण्यासाठी स्वीप ( SVEEP ) अंतर्गत इंदापूर नगर परिषदेतर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत डॉक्टर शुभम गाडेकर व डॉक्टर भाग्य श्री. चव्हाण कुटुंबाच्या लग्न समारंभाप्रसंगी नवदापत्त्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इंदापूर शहरातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान . नागरिकांनी नैतिकरित्या, निर्भीडपणे आपल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा वापर करून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुधाकर मागाडे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रमेश ढगे यांनी केले त्यावेळी उपस्थित कर्मचारी मनोज भापकर अल्ताफ पठाण प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

वाल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ वाल्हे (ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचा (संविधान) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित उपसरपंच सागर भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तकाचे पूजन तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच २६/११ मधील शहिदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.  याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अनिल हिरासकर माजी उपसरपंच अमित पवार सम्राज्ञी लंबाते यांसह तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ प्रहार संघटनेचे वाल्हे शाखाध्यक्ष निलेश कुदळे, ग्रामपंचायत सदस्य कविता पवार वैशाली पवार शीतल मदने प्रमिला पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रभाग १० मधील समीकरण बदलणार!! जयश्री दादासाहेब सोनवणे अपक्ष च्या भूमिकेत?

 इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या समीकरणाची गणित समोर येऊ लागली आहेत .इंदापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या पत्नी जयश्री दादासाहेब सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्या ठिकाणी आयात आणि दुसऱ्या उमेदवारास उमेदवारी दिल्यास प्रभाग १० मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे प्रभाग १० मधील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे? नेमका याचा फटका कोणाला बसतो.आणि नेमका निवडणुकीचा मटका कोणाला लागतो हे बघणं औचित्यपूर्ण ठरणार आहे...! 

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

नीरा कोळविहीरे गटात सविता बरकडे कॉंग्रेसच्या प्रबळ दावेदार

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय समीकरणे रंगवली जात असताना नीरा कोळविहीरे गटात ओ.बी.सी. प्रवर्गातून सविता राजेंद्र बरकडे ह्या कॉंग्रेसच्या प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आल्या आहेत. उच्चशिक्षित प्रामाणिकपणा धोरणात्मक दृष्टी अफाट जनसंपर्क आणि विकासासाठी ट्रॅक रेकोर्ड करणाऱ्या महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. एकीकडे नीरा कोळविहीरे गटात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना ( एकनाथ शिंदे ) तसेच राष्ट्रवादी ( अजित पवार ) कडून आचार विचारांची कदर राखत गठबंधनावर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.तर महाविकास आघाडीत शिवसेना ( उबाठा ) राष्ट्रवादी (शरद पवार ) तसेच कॉंग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने निश्चितच महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नीरा कोळविहीरे गटात चौरंगी लढतीचे संकेत मिळू लागले असून कॉंग्रेस पक्षाकडून उच्चशिक्षित असलेल्या सविता बरकडे यांना अधिकृत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती राजकीय स...