संत निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने निरंकारी सत्संग भवन अंथूर्णे येथे रक्तदान शिबिर संपन्न
इंदापूर:- संत निरंकारी मंडळ आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने निरंकारी सत्संग भवन अंथूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून संत निरंकारी मंडळ क्षेत्र बारामती चे क्षेत्रीय संचालक श्री किशोर माने जी उपस्थित होते यादरम्यान हे रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहिले सदर शिबिरामध्ये एकूण 101 रक्तदात्यांनी आपल्या रक्ताचे दान केले याच दरम्यान सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत संत निरंकारी मंडळाचा अध्यात्मिक सत्संग सोहळा संपन्न झाला या सत्संग सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रीय संचालक श्री किशोर माने जी यांनी मुख्य व्यासपीठावरून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले श्री किशोर माने जी म्हणाले की संत निरंकारी मिशन ची शिकवणच आहे की माणसाने माणसाशी मानवतेच्या नात्याने वागले पाहिजे जीवन जगताना मानवता अंगीकारली पाहिजे आणि हेच ध्येय पुढे ठेवून संत निरंकारी मंडळ अंथुर्णे ब्रांच यांच्यावतीने हे रक्तदान शिबिर पार पडले तरी या शिबिरास संत निरंकारी मंडळ सोलापूर चे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब ...