इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या संविधान सभेमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आला होता, तेव्हापासूनच हिंदी दिन राजभाषा दिन म्हणून जोमाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येऊ लागला.विद्यार्थ्यांना हिंदी विषयाविषयी आवड निर्माण व्हावी, शिवाय हिंदी भाषा विद्यार्थ्यांना सहजासहजी अवगत व्हावी , हिंदी विषयाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रशालेमध्ये हिंदी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते संत कबीरांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.हिंदी दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये हिंदी काव्य गायन, हिंदी निबंध स्पर्धा, सॉफ्ट बोर्ड डेकोरेशन तसेच प्रश्नमंजुषाचेही आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व शालेय वस्तु देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी हिंदी साहित्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, त्यामध्ये हिंदी कहानी, हिंदी कादंबरी, हिंदी निबंध, अनेक प्रकारचे हिंदी ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितले की, हिंदी भाषा अनेकता मे एकता स्थापन करणे की सूत्रधार है!
हिंदी भाषा वह है जिसे हम गाते हसते है!
हिंदी भाषा वह है जिसे हम अपना सुख दुःख रचते है!
हम सबका अभिमान है हिंदी
भारत की शान है हिंदी!
अशाप्रकारे हिंदी भाषेबद्दल गौरवोद्गार काढत विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व हिंदी भाषेमधूनच विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रशालेतील हिंदी विषय शिक्षिका सौ. निशा घाडगे यांनी ही हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून पटवून दिले. हिंदी दिन का साजरा करावा हेही सांगितले.
प्रशालेतील हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडेमुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब यांनी सर्वांना हिंदी दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन बांगर यांनी केले.
टिप्पण्या