इंदापूर तालुक्यात अल्पसंख्यांकांना शंभर कोटी पेक्षा जास्तीचा निधी मिळाल्याची जाणीव समाजाला कायम राहील,कहो दिल से मामा फीर से -- गफूरभाई सय्यद
इंदापूर:- वडापुरी ता इंदापूर येथे दमदार आमदार मा दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक विभाग बैठक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष गफूरभाई सय्यद यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बोलताना गफूरभाई सय्यद यांनी इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेल्या निधी संदर्भात उहापोह केला , मुस्लिम समाजासाठी मुस्लिम बहुल वस्तीमध्ये पायाभूत सुविधा तसेच कबरस्तान, दर्गाह, असर खाना इत्यादींसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे काम या पाच वर्षात आमदार साहेब यांच्या माध्यमातून झाले असल्यामुळे याची जाणीव अल्पसंख्याक समाज ठेवून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहुन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेला दत्तामामा भरणे यांना भरघोस मताधिक्याने विधानसभेवर इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवणार असल्याचे म्हटले सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम द्वेष पसरवला जात असताना विधिमंडळात दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याची भाषा करणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व हे येणाऱ्या काळात अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे सुतोवाच केले.
सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत मुस्लिम समाज व तरुणाईच्या मनात असलेल्या प्रत्येक शंका व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष या नात्याने गफूरभाई सय्यद नी दिली यावेळी तय्यब शेख यांनी दत्तामामा भरणे यांनी वडापुरी गावामध्ये केलेल्या विकासकाम व अल्पसंख्यांक निधी संदर्भात संपूर्ण माहिती देऊन मिळालेल्या निधीबद्दल आमदार दत्तामामा भरणे यांचे आभार मानले
पैगंबर शेख, रुस्तुम पठाण ,आदम भाई, फिरोज शेख ,शौकत शेख, गुलाब शेख, सलीम पठाण, अल्लाबक्ष सय्यद, फक्रुद्दीन शेख, लतीफ पठाण ,दिलावर पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होतेकहो दिल से मामा फीर से वडापुरी ता इंदापूर येथे दमदार *आमदार मा दत्तामामा भरणे* यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक विभाग बैठक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष गफूरभाई सय्यद यांच्या उपस्थितीत पार पडली
टिप्पण्या