मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मातोश्री हीराबेन मोदी देशासाठी आदर्श माता - हर्षवर्धन पाटील                इंदापूर:-  मातोश्री हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदी यांना संस्कार व नीती मूल्ये यांचे धडे देऊन देशासाठी महान सुपुत्र दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व घडविले. मातोश्री हीराबेन मोदी आदर्श माता म्हणून देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हीराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.          मानवी जीवनामध्ये आईचे स्थान सर्वोच्च असते. त्यामुळे आईचे निधन हा अतिशय दुःखदायक क्षण असतो, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. संपूर्ण देश या दुःखदायक घटने प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या परिवारा सोबत आहे. मातोश्री हीराबेन मोदी यांचे आदर्श मातेचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कराड येथे ऊस वाहतूक संघटनेच्या मोर्च्याचे नियोजन संदर्भात  जयसिंगपूर येथे दि.29 रोजी मिटींगचे आयोजन,अध्यक्ष राजु पाटील  इंदापूर प्रतिनिधी    : सध्या ऊस वाहतूक व साखर कारखाना यांना भेडसावत असणार विषय म्हणजेच ऊसतोड मुकादम. या मुकादमांनी आतापर्यंत बरेच ऊस वाहतूक करणारे मालक व शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याने साखर कारखाने ही अडचणीत सापडले आहेत. यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजु पाटील यांनी सांगली, कोल्हापूर येथे मोर्चे काढून प्रत्त्येक ठिकाणी निवेदन ही देण्यात आले. या विषयात मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी लक्ष दिल्याने तातडीने मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत मिटींगचे आयोजन केले व यात स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले.        नुकतेच नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी साखर कारखाने व ऊसतोड वाहतूक मालकांची होणारी फसवणूक टाळण्याकरीता गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या मार्फत कारखान्यांना ऊसतोड मजुर पुरविण्याच्या अनुशंगाने विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडू- आ. दत्तात्रय भरणे  इंदापूर:- नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोर्चा चे आयोजन केले होते. त्या मोर्चास माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भेट देऊन अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी मामांनी दिला. या मोर्चास आ. नितीन पवार, आ. इंद्रनील नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका  उपस्थित होत्या.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी:      प्रमुख सेवेकरी प्रदीप भगत            इंदापूर दि २६: परमपूज्य गुरुमाऊलीच्या व  श्री चंद्रकांत दादा यांच्या कृपाशीर्वादाने व  श्री सतीश दादा मोटे  यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथ व पादुका यांचे, आगमन झाले इंदापूर शहरातील व तालुक्यातील भाविकांनी पादुका पूजन करून रथाचे दर्शन घेतले. अशी माहिती स्वामी समर्थ केंद्र इंदापूर शहर प्रमुख सेवेकरी प्रदीप भगत यांनी दिली. इंदापूर शहरातील मयुर हाउसिंग सोसायटी महतीनगर आवारात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये उपस्थित भाविकांना बंसोदे काका वय वर्ष ७८ यांनी स्वामी समर्थांची माहिती सांगितली. यावेळी जे के शिंदे, विकास खिलारे, शिवतेज दडस, महेश वेदपाठक, गुरुनाथ वायकुळे, सागर धारूरकर, निखिल दुनाखे, अथर्व भगत, युवराज जगताप, सोमनाथ तारगावकर, नितीन देवकर पाटील, पंचकमिटी, विभाग प्रतिनिधी, तसेच पुरुष व महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील म...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नागरिकांनी मास्क वापरून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - पै.अशोकभाऊ देवकर     इंदापूर:- सध्या चीनसह इतर देशामध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ची भीती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर यांनी केले आहे.    पै.अशोकभाऊ देवकर म्हणाले की,' कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असुन या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घ्यावी. योग्य खबरदारीच्या आधारे हे संकट टाळता येईल.पण कोणीही घाबरून जाऊ नका, आफवावर विश्वास ठेऊ नयेत, पण आपली काळजी आपणच घ्यावी, 

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र उसतोड मजुरांसाठी मोफत फिरता दवाखाना,व कोपिवरची शाळा अभ्यास वर्ग सोमवारी सुरू होणार  इंदापूर;-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र उसतोड मजुरांसाठी मोफत फिरता दवाखाना आणि,उसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात खंड पडू नये म्हणून शैक्षणिक सुविधा "कोपिवरची शाळा अभ्यास वर्गाचे"उद्घाटन समारंभ सोमवार दि. २६/१२/२०२२ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात येणार असून शुभहस्ते * देवराव लोकरे,कार्यकारी संचालक कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना,प्रमुख उपस्थिती,सौ. पद्माताई मालोजी भोसले,अध्यक्षा, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,तुषार रंजणकर,खजिनदार, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,श्री. शरद काळे,ओ. एस कर्मयोगी ,रामचंद्र पाटील कार्यकारी संचालक,नीरा-भीमा सह. साखर कारखाना, गिरीश मोहन देसाई,सेक्रेटरी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,अरविंद गरटकर,ट्रस्टी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,सुभाष घोगरे,ओ. एस नीरा-भीमा,श्री. किशोर हिंगमिरे,मुख्य शेतकी अधिकारी कर्मयोगी श्री. धनंजय लिंबोरे मुख्य शेतकी अधिकारी नीर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सौ.मंगलाताई बाळासाहेब व्यवहारे सरपंच प्रतिनिधींचा धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार - श्रीधर बाब्रस इंदापूर:- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला. सदर निवडणूकीमध्ये आमचे मित्र श्री बाळासाहेब व्यवहारे यांच्या पत्नी सौ.मंगलाताई बाळासाहेब व्यवहारे या सरपंचपदी निवडून आल्या. आज त्यांचा सत्कार बाब्रस मळा येथे धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मा. उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी, जेष्ठ नेते एकनाथराव गारदी, मा.नगरसेवक व मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा.नगरसेवक व मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, युवा नेते निखीलशेठ बाब्रस, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत शिंदे,  बाळासाहेब म्हेत्रे, मा.नगरसेवक हरिदास हराळे, शिवसेना नेते ज्ञानेश्वर चौगुले, स्वप्नील मखरे, सुभाष खरे सर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अहमदराजा सय्यद, रमेश बनसोडे, मनोज भापकर, अनिल चव्हाण, दत्तू शिंदे, समीर दुधनकर, गणेश गोरे, लक्ष्मण घुगे, अज...