मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सैनिक दलाच्या वतीने, २६ नोव्हेंबर "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा- अशोकराव पोळ   इंदापूर:- दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते ०१ या वेळेत समता सैनिक दल, या राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटनेच्या वतिने सर्व समता सैनिकांनी व पदाअधिकाऱ्यांनी सालाबाद प्रमाणे २६ नोव्हेंबर  "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा केला.     या संविधान दिनाचे औचित्य साधुन इंदापूर नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन  करुन इंदापूर शहरातील मध्यभागी असलेला खडकपुरा चौकामधील संविधान स्तंभाला फुलांच्या माळांने सजवुन त्याठिकाणी उ्द्देशीकेच्या वाचनासह जयघोष करण्यात आला.   इंदापूर तालूका तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिका या शासकीय कार्यालयामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून त्या त्या विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थित संविधानाची उद्देशीकेचा फोटो कार्यालयामध्ये समोर दर्शनीभागावर लावण्यासाठी १८ × २० आकाराचे फ्रेमसह...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी इंदापूरात साजरी   इंदापूर:-  येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंदापूर जि. पुणे येथील संत रोहिदास नगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज,यांच्या पुण्यतिथी निमित्त मा.नगराध्यक्ष श्री.विठ्ठलराव आप्पा ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अहेमदरजा सय्यद ,अँड. ज्ञानदेव ननवरे,गणेश शेवाळे,कमलाकर कांबळे,सचिन शेवाळे,प्रविण ननवरे,सुभाष ननवरे,कृष्णा हाब्बू,शाहरूख मोमीन व सर्व समाज बांधव उपस्थित होते.    या वेळी बोलताना,विठ्ठलराव ननवरे म्हणाले की, समाजातील जाती-पाती,गरीब -श्रीमंती  सारखे भेदभाव  दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.या महान संतास उत्तर भारतात संत रविदास तर आपल्या महाराष्ट्रात त्यांना संत रोहिदास म्हणून ओळखले ज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

*इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी* इंदापुर -  दिनांक 28 नोव्हेंबर रोजी इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया मध्ये प्रथम वर्ष  एम एस सी  (रसायनशास्त्र)विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली          कार्यक्रमाच्या प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांनी महाविद्यालयातील  उच्च शिक्षण घेण्यासाठी  सर्व सुविधा, रिसर्च सेंटर,   पी एच डी रजिस्ट्रेशन साठी विदयार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही  सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी दिला. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ . जयश्री गटकुळ यांनी गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही  म्हणून शिक्षणाची मुहुर्त मेढ रोवणारे स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक  महात्मा जोतीबा फुले ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पुणे शहरात १ लाख ५५ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त     पुणे, दि. 28: अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने लोहिया नगर येथील समीर जमीर शेख यांच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे १ लाख ५५ हजार ८७४ रुपये प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी केले आहे.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ मध्ये महात्मा फुले नगर मध्ये  अंतर्गत रस्ता व भूमिगत ड्रेनेज कामाला सुरुवात  इंदापूर:-  शहर प्रभाग क्रमांक १ मध्ये महात्मा फुले नगर मधील अमर नलवडे घर ते मोटे मामा घरापर्यंत अंतर्गत रस्ता व भूमिगत ड्रेनेज, तसेच गाडेकर घर ते सागर गानबोटे घरापर्यंत अंतर्गत रस्ता शुभारंभ संपन्न झाला.  या वेळी इंदापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती व विद्यमान नगरसेवक अनिकेत दादा वाघ,राष्ट्रवादी शहर वरिष्ठ उपाध्यक्ष महादेवराव लोखंडे, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर मखरे, इंदापूर शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय अध्यक्ष विकास खिलारे, इंदापूर शहर राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष मुकुंद साळुंके,आर जे पठाण, काळे,चिंचकर, योग गुरू चव्हाण सर, श्री व सौ गाडेकर उपस्थित होते

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना  स्मृतिदिनी रत्नाकर तात्यांच्या शाळेत अभिवादन, *इंदापूर* (दि.२८) -: येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा फुले व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी दिपाली ठोंबरे,रूपाली ठोंबरे, अंजली गव्हाणे, (७ वी) यांनी गीत सादर केले. दत्ता घुंगासे, सुजित निकम, पुंडलिक रोकडे, अनिल मंजुळे (१२ वी)आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी राजेंद्र हाळणोर, मनिषा जगताप आदी शिक्षकांची भाषणे झाली. यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक साह...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

केंद्र व राज्य सरकारकडून गायरान जमीन आदेशाचा फेरविचार व्हावा, तहसीलदार श्रीकांत पाटील यांना आज निवेदन देणार- महारूद्र पाटील इंदापूर:- उजनी पुनर्वसित गावांमध्ये सन १९७० साली गावच्या जमिनी व घरे उजनी जलाशयासाठी महाराष्ट्र सरकारने संपादित केली होती. त्या वेळेस काही लोकांनी पुनर्वसन गावात गायरान जमिनीत आपले जनावरांचे गोठे व घरे आहेत. त्या गायरान जमिनीतील अतिक्रमणे १६ डिसेंबरपर्यंत काढावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून नोटिसा नागरिकांना मिळू लागल्या आहेत. त्यावर फेरविचार व्हावा, अशी मागणी इंदापूर तालुका गायरान जमीन बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे. गंगावळण या गावात शासनाने त्या वेळी नागरिकांना पर्याय जागा म्हणून जमीन सर्व्हे नंबर ७१ /१ /ब मध्ये सरकारच्या धोरणानुसार लोकांना अधिक असलेल्या लोकसंख्येमुळे व ग्रामीण व निवारा या मूलभूत सुविधा देण्याच्या सोडून शासनाने अद्याप हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केलेले नाही. असे असताना लोकांना राहण्यासाठी घरे व जनावरांसाठी केलेला निवारा कायम करावयाचे सोडून केंद्र व राज...