इंदापूर तालुक्याचे आधारवड, परखड नेता हरपला, बळीराजाचा आधार गेला ज्येष्ठ गांधीवादी नेते गोकुळदास शहा उर्फ भाईंचे निधन,मनाला चटका लावणारे- डाॅ.संदेश शहा इंदापूर :- तालुक्याचे आधारवड, कल्पतरू नेतृत्व असलेले ज्येष्ठ गांधीवादी नेते गोकुळ दास शहा उर्फ भाई ( वय ८७ ) हे दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ६.१५ मिनिटांनी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे इंदापूर शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पूर्वी इंदापूर व आता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष तसेच सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग तीस वर्ष हजारो हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. काही अपंगाना त्यांनी जयपूर फूट दिले तर काही लोकांच्या टॉन्सिल व महिलांच्या शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून मोफत केल्या. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथे आणण्यात तसेच सोहळ्याची सेवा करण्...
SHIVSRUSTHI NEWS