इंदापूर:- नगरपालिका कामगारांच्या कामा संदर्भात मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व खासदार मा.राहुलजी शेवाळे यांच्या सोबत त्यांच्या निवासस्थानी दिलखुलास चर्चा झाली. लवकरच इंदापूर नगरपालिका मधील कर्मचारी बांधवांचा प्रश्न सोडवण्यात येईल. असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष,बहुजन नेते,विठ्ठल आप्पा ननवरे व कर्मचारी बांधवांना दिला.
चर्चा करताना विठ्ठल आप्पा ननवरे व मुख्यमंत्री यांना इंदापूर नगरपालिकेचा अनेक दिवसापासून चा प्रलंबित असणारा प्रश्न सांगितला यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याचा शब्द दिला असल्याची माहिती ननवरे यांनी पत्रकारांना दिली
मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांचे मन:पूर्वक आभार...विठ्ठलराव ननवरे यांनी मानले, या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या