इंदापूर:- डाॅ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे २ कोटी ७७ लाख रुपयाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर याच्यां हस्ते श्रीफळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून व जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या प्रयत्नांतून दलितवस्ती सुधारणा योजने अंतर्गत डाॅ.आंबेडकर नगर,अण्णाभाऊ साठे नगर, लोकमान्य नगर येथील रस्ता करणे २ कोटी १० लाख व नागरी दलितेत्तर विकास योजना अंतर्गत बंदिस्त गटार रक्कम ६७ लाख, एकुण २ कोठी ७७ लाख या कामाचा श्रीफळ फोडून प्रत्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना गवळी,माजी उपनगराध्यक्ष, राजेश शिंदे,विद्यमान नगरसेविका राजश्री अशोक
मखरे,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, दिलीप शिंदे, बाळासाहेब मखरे,राजू गुळीक, बाळु आडसुळ, चंद्रकांत सोनवणे, स्वप्नील मखरे,राजू सागर, ,शुभाष खरे,शुभम मखरे,उमेश ढावरे, राजू शिंदे,बन्सी बंडलकर,संतोष धोत्रे,नाथा ढावरे,बलभीम सोनवणे, अजय सोनवणे,विलास सोनवणे,भिमा आडसुळ,अक्षय मखरे, उपस्थित होते.
टिप्पण्या