शेखर पानसरे आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार इंदापूर:-निमसाखर ता इंदापूर जिल्हा पुणे नुकताच मला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याचेच औचित्य साधून आज आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच श्री. धैर्यशील भैय्या रणवरे पाटील यांनी समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निमसाखर या ठिकाणी शेखर पानसरे यांचा सन्मान केला पाठीवरती शाबासकीची थाप दिली व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्ही तुझ्या बरोबर आहोत, ग्रामविकास अधिकारी श्री.भिलारे भाऊ साहेब ग्रामपंचायतचे सदस्य श्री राजेंद्र रणमोडे ग्रामपंचायत सदस्य श्री सुदाम भोसले* *ग्रामपंचायत सदस्य सौ शहानुर मुलाणी ग्रामपंचायत सदस्या सौ.नीताताई माने ग्रामपंचायत क्लार्क श्री विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते .
SHIVSRUSTHI NEWS