इंदापूर:-आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तर प्रदीप गारटकर प्रमुख पाहुणे,तालुक्याचा चौफेर विकास होत असताना इंदापूर शहर देखील विकास कामाच्या बाबतीत पाठी मागे राहणार नाही याची काळजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
रविवार दि. १७ एप्रिल रोजी इंदापूर शहरातील १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते होत आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होत असून प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत.
इंदापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ढवळे व शहराध्यक्ष उमाताई इंगोले व इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इमरान शेख हे या कार्यक्रमाचे विनीत असून, या कार्यक्रमास शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी,नगरसेवक, नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष,तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१० कोटीची विकास कामे पुढील प्रमाणे
१) इंदापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या(ITI) नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
२) इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतु कार्यालयाचे उद्घाटन
३) इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरण व इंदापूर शहर अंतर्गत पथदिवे बसविणे तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आसल्याची माहीती देण्यात आली.
टिप्पण्या