राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, यांची,रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी .धुमधडाक्यात वाजली
इंदापूर :- नुसता हलगीचा आवाज जरी ऐकला तर आंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत, ती हलगी दत्तात्रय भरणे यांनी धुमधडाक्यात वाजवली यावर आनेकांना वाटलं.....
चैती पौरणीमेची थाट.. भक्तांचा गजबजात..
लाईती चा लक लकाट दारु गोळ्या चा कड कडाट ...
पालखी हरान तुरीन आबदागीर न साजती
पुढं बाई रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी वाजती.... . आशा ओळी आठवत नसतील तर नवच......
तालुक्यातील निमगांव केतकी येथे केतकेश्वर हलगी वादक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले.यावेळी दत्तात्रय भरणे यांनी हलगी वाजवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात हलगी वाद्य घेऊन ते वाजवल्याने सर्वजन अचंबित झाले.
हलगी वादकांचा आकर्षक तालबद्ध असा हलगी वाजवण्याचा प्रकार सुरू होता तो पाहुन राज्यमंत्री भरणे यांनाही हलगी वाजवण्याचा मोह आवरला नाही.त्यांनी गळ्यात हलगी घेऊन इतर हलगी बहाद्दरांसह हलगी वाजवली.त्यामुळे भरणेंच्या ही हलगी वाजवण्याची सर्वत्र चर्चा आहे. सर्वगुणसंपन्न आमदार दत्तात्रय भरणे जनसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत घराघरात पोहचले आहेत,
टिप्पण्या