इंदापूर :- नगरपालिकेच्या समोरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आज तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने रुग्णांना फळे वाटप तसेच जिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक व बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात आवडती लेखणी पेन भेट देण्यात आला, यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात म्हणाल्या की आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या मुळे आपण ताठमानेने फिरतो ते नसते तर आपण कोणीच नसतो बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज मी आपल्यासमोर ताठ मानेने उभी आहे बाबासाहेबांच्या विचारानेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही आमच्या तेजपृथ्वी ग्रुप कडून रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व रुग्णालयातील व पोलीस प्रशासकीय अधिकारि व कर्मचारी यांना बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तक व बाबासाहेबांनि राज्य घटना लिहण्यासाठी वापरलेले महत्त्वाचे साधन म्हणजे लेखणी (पेन )हे आम्ही तेजपृथ्वी ग्रुप कडून भेट देत आहे तसेच अनिताताई खरात रुग्णालयातील कर्मचारी व महिलांना उद्देशून म्हणाल्या की आपल्याला कधी हि अडचण आली तरी आपण आम्हाला कॉल करावा आम्ही आमच्या ग्रुपच्या व महिला दक्षता समितीच्या माध्यमातून जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तेजपृथ्वी ग्रुप हा बाबासाहेब आंबेडकर , शिवजी महाराज ,अहिल्या बाई होळकर सावित्री बाई फुले यांच्या विचाराने तसेच महिंद्रदादा रेडके, पांडुरंग मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गोरगरीब शेतकरी विद्यार्थी कष्टकरी यांच्यासाठी कायम काम करत राहील ,यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खामकर सर , डॉक्टर साळुंखे सर ,नानासाहेब खरात यांनी बाबासाहेबां वरील विचार व्यक्त केले .या वेळेस पीएसआय चौधर साहेब गुप्तहेर खात्याचे पवन भोईटे साहेब पोलीस अधिकारी सलमान खान उपजिल्हा रुग्णालयाच्या वृषाली निंबाळकर मॅडम ,आप्पासाहेब माने, ग्रूपचे उपाध्यक्ष गणेशभाऊ शिंगाडे प्रसाद पाधे ,रेश्मा शेख संगीता गिरमे ,सचिन सुळ रमेश टुले हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या