इंदापूर:- तालुक्यातील तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार
दि. १६ एप्रिल रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप गारटकर हे असणार आहेत.
लाखेवडीच्या सभेत श्री.शरद पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची इंदापूर तालुक्याचे जागृत लोक प्रतिनिधी म्हणून गुणगौरव केला होता. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, इंदापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवारांच्या वाक्याला राज्यमंत्री भरणे खरे उतरले असे इंदापूरकरांनी प्रतिक्रिया दिली.
आजमितीला राज्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात अंदाजे १३०० कोटींची कामे आणली आहेत.काही कामे प्रगती पथावर आहेत, काही कामे प्रतीक्षेत आहेत, काहींची नुकतीच सुरुवात झाली आहे.
त्यामुळे तालुक्यातील वाहणारी विकासकामांची गंगा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून वाहताना दिसत आहे. यामुळे सध्यातरी श्री.भरणे यांची लोकप्रियता तालुक्यात लहानांपासून ते थोरांपर्यंत असलेली दिसून येते.
डाळज नं २ येथे सुमारे १३ कोटी
६६लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.डाळज नं ३ गावात ८३लाखांच्या कामाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.
पोंधवडी – भादलवाडी – डाळज रस्ता व विविध विकास १४ कोटी कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा श्री. भरणे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री.बाळासाहेब घोलप यांची विशेष उपस्थिती मानली जाणार कारण उद्याच्या सभेत ते काय बोलणार आहे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यानंतर वैशालीताई पाटील, श्री. प्रताप पाटील,श्री.प्रवीण माने, श्री. हनुमंत बंडगर,श्री. हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, शितलताई वणवे, श्री.डी. एन.जगताप,श्री. नंदकुमार पानसरे, श्री. ॲड.शुभम निंबाळकर,श्री. ॲड.प्रदीप जगताप, सौ. धनश्री डोईफोडे,श्री विकास कुंभार, सौ.प्रमिला झोळ, सौ.प्रियांका गलांडे,श्री. विश्वजीत गायकवाड आदी सर्व प्रमुख आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
भादल वाडी येथे ५.००वा., यानंतर सायं.५.३० वा डाळज नं १ व३ येथील कामाचे भूमिपूजन, व शेवटी डाळज नं २ येथील कामांचे भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर राज्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे
टिप्पण्या