इंदापूर ;- शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून दत्तात्रय भरणे यांनी
एक आदर्श शहर कसं असावं तर नावाला स्मार्ट नाही तर आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये स्मार्ट आहोत असे काम इंदापूरमध्ये झालेले आहे.मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल,मी करून संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो म्हणत इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पाठ थोपाटली आहे.
इंदापूर शहरातील आय.टी.आय. इमारत नवीन वर्ग खोल्या, तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालय , इंदापूर शहर अंतर्गत चौक सुशोभिकरण व अंतर्गत पथदिवे तसेच वीरश्री मालोजीराजे भोसले चौकातील सुशोभिकरण या सह विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत रविवारी दि.१७ एप्रिल रोजी पार पडले यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आजी माजी पदाधिकारी,नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित होते.
सुळे पुढे म्हणाल्या की,नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन इंदापूरचा जो चेहरामोहरा बदलला आहे.ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरची उंची वाढवली आहे.काळ बदलत चालला आहे लोकांच्या गरजा वाढत आहेत. स्वच्छता पाणी,वीज याबरोबर शहराचे सुशोभिकरण करुन हे स्वच्छ शहर ठेवणे हे ज्याची सत्ता आहे त्याची ती नैतिक जबाबदारी
आहे.दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषद मधूनचं त्यांचे काम दाखवण्यास सुरवात केली.त्यांचे काम पाहुन पक्षाने त्यांना मंत्रीपद दिले.एखाद्या मंत्र्याचा मतदार संघ कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले.राज्यमंत्री असताना असं आहे मगं कॅबिनेट झाले तर काय करतील अशा शब्दात सुळे यांनी भरणे यांच्या कार्याचे कौतुक केले.
टिप्पण्या