इंदापूर:-निमसाखर ता इंदापूर जिल्हा पुणे नुकताच मला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याचेच औचित्य साधून आज आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच श्री. धैर्यशील भैय्या रणवरे पाटील यांनी समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निमसाखर या ठिकाणी शेखर पानसरे यांचा सन्मान केला पाठीवरती शाबासकीची थाप दिली व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्ही तुझ्या बरोबर आहोत, ग्रामविकास अधिकारी श्री.भिलारे भाऊ साहेब ग्रामपंचायतचे सदस्य श्री राजेंद्र रणमोडे ग्रामपंचायत सदस्य श्री सुदाम भोसले* *ग्रामपंचायत सदस्य सौ शहानुर मुलाणी ग्रामपंचायत सदस्या सौ.नीताताई माने ग्रामपंचायत क्लार्क श्री विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते .
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या