पुणे जिल्ह्यामध्ये मध्ये आठ तालुकाअंतर्गत जिजाऊ ब्रिगेड चे कार्य कौतुकास्पद- नंदाताई शिंदे इंदापूर:-जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा कार्यकारिणी मंडळ, पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांचा पुणे(पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा जयश्री गटकुळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला *मराठा सेवा संघाने महिलांना वैचारिक पातळीवर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,परंपरा नष्ट व्हाव्यात या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड संकल्पनेची सुरुवात केली विधायक कार्यात अत्यंत निरागस,प्रसन्न, उत्साहपूर्वक मानसिकता निर्माण होते, सहकार्याची भूमिका घेतल्याने समाजविकास होतो आणि समाजाकडून आपोआप आशीर्वाद मिळतो, जिजाऊ ब्रिगेड पुणे पुर्व जिल्ह्यामध्ये इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, मुळशी दौंड, पुरंदर, जुन्नर या आठ तालुका अंतर्गत जिजाऊ ब्रिगेड चे कार्य कौतुकास्पद असून खुप मोठे महिला संगठन आणि...
SHIVSRUSTHI NEWS