इंदापूर:-जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा कार्यकारिणी मंडळ, पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांचा पुणे(पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा जयश्री गटकुळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला
*मराठा सेवा संघाने महिलांना वैचारिक पातळीवर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,परंपरा नष्ट व्हाव्यात या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड संकल्पनेची सुरुवात केली विधायक कार्यात अत्यंत निरागस,प्रसन्न, उत्साहपूर्वक मानसिकता निर्माण होते, सहकार्याची भूमिका घेतल्याने समाजविकास होतो आणि समाजाकडून आपोआप आशीर्वाद मिळतो, जिजाऊ ब्रिगेड पुणे पुर्व जिल्ह्यामध्ये इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, मुळशी दौंड, पुरंदर, जुन्नर या आठ तालुका अंतर्गत जिजाऊ ब्रिगेड चे कार्य कौतुकास्पद असून खुप मोठे महिला संगठन आणि संगठनात्मक कार्य करणारा पुणे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे, यापुढील कार्यास शुभेच्छा देत युवा पिढी, महिला यांनी अशा विधायक कार्यात सहभागी व्हावे* असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांनी केले.
*सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, शाहू,फुले,आंबेडकर .. महामानव आणि राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीमाई, रमाई... अशा महान नारीशक्ती यांची विचारधारा जनमानसात नेण्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचे कार्य असून अशा विधायक कार्यासाठी समाजातून प्रोत्साहन मिळत आहे.* असे मत जिजाऊ ब्रिगेड पुणे(पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले,
जिजाऊ ब्रिगेड पुणे(पुर्व) कार्यध्यक्षा शिवमती जयश्री खबाले यांनी प्रास्ताविक केले.जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुकाध्यक्षा शिवमती राधिका निवास शेळके यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर, प्रतिक झोळ, सागर जाधव, योगेश्री गटकुळ, वैशाली गटकुळ , राजश्री जगताप अन्य मान्यवर उपस्थित होते
टिप्पण्या