इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट, इंग्लिश मेडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कालठण नं.1, तालुका- इंदापूर , जिल्हा- पुणे येथील बारावीच्या परीक्षेत भरघोस गुण प्राप्त करून यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा. प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांनी *कोरोना लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना परिक्षा संदर्भात खुप ताणतणाव निर्माण झाला होता परंतु अशा परिस्थितीशी सामना करत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेत आपली गुणवत्ता टिकवून ठेवण्याची तयारी दाखविली आणि उत्तुंग यश संपादन केले आहे, आज सर्व मुलीनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले असून जिजाऊ इन्स्टिट्यूटने सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा जपली आहे याचे श्रेय विद्यार्थी, प्राचार्य,शिक्षक आणि पालक यांना आहे* असे मत व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्यावतीने डॉ.भास्कर गटकुळ यांच्या हस्ते आकांक्षा राजेंद्र पाडूळे (९५ टक्के)या प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा शाल,ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मेडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कालठण नं.1, तालुका- इंदापूर , जिल्हा- पुणे च्या प्राचार्या आणि सचिव स्मिता भोरे यांच्या हस्ते प्रगती धनाजी पारेकर (९३ टक्के) या द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्षा जयश्री खबाले यांच्या हस्ते तृतीय क्रमांक मिळवलेल्या सईश्वरी किशोर साखरे(९२टक्के) या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. सागर जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
टिप्पण्या