इंदापूर:
सध्या स्पर्धेचे युग असल्याने व्यवसायामध्ये यशस्वी होणेसाठी व नाव कमविण्यासाठी ग्राहकांना नाविन्यपूर्ण व गुणवत्तापुर्ण अशी दर्जेदार सेवा द्यावी, असे आवाहन निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील यांनी सोमवारी (दि.9) केले.
इंदापूर येथे अक्षय बाळकृष्ण क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या देवा कॉम्प्युटर चे उद्घाटन राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी राजवर्धन पाटील यांनी नूतन व्यवसायासाठी चि.अक्षय क्षीरसागर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी मा. आबा पाटील, हर्षल पाटील, सदाशिव दळवी, बाळकृष्ण शिरसागर, चेतन जाधव, प्रवीण अनपट, अक्षय सूर्यवंशी व मित्र परिवार उपस्थित होता.
____________________________
फोटो:- इंदापूर येथे कॉम्प्युटर दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी राजवर्धनदादा पाटील.
टिप्पण्या