मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

आव्हानावर विजय मिळवणे, इंदापूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा, श्रीकांत पाटील सिंघम पार्ट टू रिटर्न -नितीन आरडे 
 *इंदापूर तालुक्याला लाभलेले  कर्तुत्ववान अधिकारी सहसा इंदापूरला पुन्हा येत नाहीत. पण ज्यांनी निरा भीमा खोऱ्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खननास चाप लावला गुन्हेगार होऊ पाहणारी पिढी सावरण्याचा प्रयत्न केला.* 
 *तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी काम केले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेला प्रशासकीय अधिकारी कसा असतो हे समजले परंतु दुर्दैवाने त्यांची बदली झाली व बरीच कामे अर्धी राहिली.* 
*आता पुन्हा आल्यानंतर मात्र इंदापूरकरांची फार मोठी आशा आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीच्या रस्त्यावरून वाद आहेत अनेक जण वहिवाटीची रस्ते मोडून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अडथळा निर्माण करत आहेत. त्यांचे दावे तहसिलदार न्यायालयात  प्रलंबित आहेत.*
 *जमिनींच्या खरेदी-विक्रीमध्ये घोटाळे आहेत. नसलेली जमीन विकली जात आहे. तर बनावट हक्कसोड पत्राद्वारे बहिणीचे हक्क सोड केले जात आहेत. एकत्रित कुटुंबाच्या मालमत्ता कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला घेऊन मुद्रांक कायद्यातील पळवाट काढून विक्री केली जात आहे. व त्या अनुषंगाने पुन्हा वाद निर्माण होत आहेत.*

 *राज्यांमध्ये तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू असताना  निबंधक कार्यालयाकडून मात्र जमिनीचे तुकडे पाडले जात आहेत. १० आर क्षेत्रामध्ये २० खरेदीदार खातेदार निर्माण करून शासनाच्या तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याच्या विरोधात व्यवहार केले जात आहेत. एका बाजूला कायदेभंग तर दुसर्‍या बाजूला शासनाचा महसूल बुडवण्याचा उद्योग केला जात आहे. व हे सर्व शासनाचा पगार घेणारे लोक करत आहेत.* 

*ऑनलाइन उतारे करत असताना तलाठ्यांनी अनेक प्रमाद (चुका)करून ठेवल्या आहेत. कुणाच्या ७/१२ चे क्षेत्र चुकीचे, तर कोणाचे नाव चुकीचे, कुणाचा आकार चुकीचा तर एकूण आकार भरत नाही अशी परिस्थिती  तलाठ्यांनी निर्माण करून ठेवली आहे अनेक खरेदीखताची नोंद कारण नसताना प्रलंबित ठेवलेली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण केले जाते त्यांना आर्थिक मागणी केली जाते ते व मागणी न पूर्ण केल्यास प्रकरण प्रलंबित ठेवले जाते व हे सर्व उद्योग शासकीय सेवेतील विलंबास प्रतिबंध कायद्याचे विरोधात केले जातात.  झिरो तलाठी भाऊसाहेब शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. तर मंडल अधिकाऱ्यांची स्थितीच न्यारी बहुतेक मंडलाधिकारी हे  कार्यालयात उपस्थित नसतात परंतु त्यांचे खाजगी साहेब मात्र उपस्थित असतात काही खाजगी सहाय्यक तर एवढे खतरनाक आहेत की covid-19 च्या काळामध्ये नागरिकांची कागदपत्रे सुद्धा हातात घेत नाहीत कोणत्याही कागदपत्राची नागरिकांना पोच देत नाहीत श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असलेले वयोवृद्ध नागरिक संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी अपंग योजनेतील अपंग शेतकरी दाखला २१ हजार उत्पन्न दाखला ईडब्ल्यूएस दाखला यासाठी लागणारी टिपणी अहवाल या सर्वांनी पैसे दिल्याशिवाय मंडलाधिकारी देतच नाहीत तर त्याही पुढे जाऊन त्यांचे कारकून हे मंडळ अधिकाऱ्याच्या पेक्षा वरिष्ठ असल्याचा आव आणून नागरिकांना हेलपाटे घालण्यास भाग पडतात  विशेष म्हणजे नागरिकांना तक्रार कोणाकडे करावी व त्याचे निरसन कसे होईल हेच माहित नाही त्यामुळे विद्यार्थी विधवा महिला ज्येष्ठ नागरिक यांचे प्रचंड ससेहोलपट या कार्यालयांकडून केली जाते*
*शासनाच्या पुरवठा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याची गाव पातळीवर वितरण करणारी व्यवस्था आजही भ्रष्टाचार करण्याची संधी शोधत असते आजही गोरगरीब दीनदलित शेतकरी शेतमजुरांचे पॉजमशीनवर अंगठे घेऊन त्यांना कमी धान्य दिले जाते.आशी माहीती .नितीन दादा आरडे 
प्रदेशाध्यक्ष,शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...