इंदापूर:-विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था, बावडा यांच्यावतीने आज पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांना कोविड योद्धा म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना कालखंडात अनेक उपयोजना करीत कोरोना रुग्णासाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली असल्याने विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेने त्यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित केले.
अंकिता पाटील म्हणाल्या,' या सन्मानासाठी मी विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था, बावडा च्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानते. हा पुरस्कार म्हणजे माझा व माझ्या सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. कोविड योद्धा हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील व पुढील कार्य करण्यास प्रोत्साहित करीत राहील.
विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बाळू कांबळे,उपाध्यक्ष भीमराव प्रल्हाद कांबळे, सचिव संतोष ज्ञानू सावंत, खजिनदार गौतम गोरख जगताप व इतर मान्यवरांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टिप्पण्या