पालखी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत- हर्षवर्धन पाटील इंदापूर: तालुक्यातील भवानीनगर ते लुमेवाडी दरम्यान च्या गावातील रस्त्यालगतचे क्षेत्र जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी संपादित होणार आहे. या महामार्गसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत,असे प्रतिपादन राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.इंदापूर येथे बुधवारी (दि.15) भूसंपादन शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बारामती विभागाचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाटील बोलत होते. पालखी महामार्गसाठी भूसंपादित इंदापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि रहिवासी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या न्याय मागण्यासाठी निवेदन दिले होते तसेच कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते याविषयी आपले प्रश्न मांडले होते. या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादा...
SHIVSRUSTHI NEWS