इंदापुर:*३ जुलै २०२० च्या शासन आदेशानुसार आजची सर्वसाधारण सभा व्हिडीओ काँन्फरन्सिंग द्वारे दुपारी बारा वाजता सुरू होऊन दोन वाजता संपन्न झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी स्वीकृत सदस्य श्रीधर बाब्रस यांनी राजीनामा दिलेमुळे रिक्त झालेल्या जागेवर स्वीकृत सदस्यपदी श्री.दादासाहेब सोनवणे यांची निवड झालेचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी जाहीर केले.
इंदापूर तालुक्याची आणेवारी २०१८ मध्ये ५० पैश्यापेक्षा कमी होती.त्यामुळे २०१८ मध्ये इंदापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता.दुष्काळाचा परिणाम शहरातील नागरीकरण व अर्थव्यवस्थेवर देखील होतो.तसेच गेल्या चार महिन्यापासून कोरोनाच्या काळातील शहरातील नागरीकांची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच गाळेधारकांचे भाडे माफ करणेसंदर्भात नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे व जिल्हाधिकारी श्री.नवलकिशोर राम यांचेकडे प्रस्ताव सादर करणेसंबंधीची सुचना नगरपरिषदेचे
गटनेते श्री.कैलास कदम यांनी मांडली.त्यास सर्वानुमुते पाठिंबा देण्यात आला.
टिप्पण्या