इंदापुर :सध्या कारखान्याकडे ३0000 लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प चालु असुन
आपण त्यामध्ये ३0 % (४0000 लिटर्स प्रती दिन) वाढ चालु हंगामात करीत असुन वार्षिक इथनाल निर्मिती ७0 .00 लाख लिटर्स होईल आणी आर . एस / इ.एन.ए. सह १.३0 कोटी
लिटर्स एकूण उत्पादन होईल . आसवणी प्रकल्पाची सुध्दा भविष्यात वाढ़ करणार आसल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे . त्यासाठी आवश्यक इथेनॉल स्टोअरेज टॅक उभारणीचा भुमिपुजन समारंभ आयोजित
केला ते बोलत होते प्रत्येकी ७.५० लाख लिटर्स क्षमतेच्या एकुण तीन टेंक पेसो लायसन्स
(पेट्रोलियम
एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑरगनायझेशन) नियमानुसर उभारणी केली जाणार आहे . एकुण इथेनॉल
स्टोअरेज २२ .५० लाख लिटर्स होणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार इथेनॉल पेट्रोलमध्ये
मिसळणेसाठी वापर होणार आहे .
सध्या बी हेवी मोलासिस व सिरप पासुन इथेनॉल निर्मितीस परवानगणी मिळाली असुन त्याचे दर सुध्दा चांगले आहेत . (वी हेबी रू. ५४.७८ , सी हेवी
-रू . ४३ .७५ सिरप -रू. ५९ . २७)जेवढे इथेनॉल निर्मिती होईल तेवढी उचल होणार आहे. बी हेवी
मोलासिस पासुन इथेनॉल निर्मिती कल्यास जादा होणारी साखर कमी होणार आहे. त्यामुळे जादा होणा-या साखरेच्या साठ्यावर मर्यादा येऊन साखर साठवनुकीची अडचण दुर होईल.
साखरेवरील बँकेचे व्याज कमी होणार आहे . तसेच बी हेरवी मोलासिस पासुन इथेनॉल
केल्यामुळे स्टिम व विज बचत होऊन साखरेचा उत्पादन खर्च कमी होणार आहे व कारखान्याची
गाळप क्षमता वाढून साखरेच्या दर्जात वाढ होणार आहे. फक्त साखर निर्मिती करणेपेक्षा बी
हेवी मोलासिस पासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखर उत्पादन खर्चात बचत होऊन अधिकचे
उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. भविष्यामध्ये कारखान्याचा आर्थिक फायदा होऊन त्यांचा
सभासदाना फायदा होणार आहे.
असे हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले ,यावेळी व्हा.चेअरमन पद्माताई भोसले, संचालक मंडळ श्री भरतशेठ सुरेशदास शहा,श्री हनुमंत अंकुश जाधव, राहुल विठ्ठठल जाधव,.सुभाष बलभिम काळे,श्री मानसिंग रामचंद्र जगताप,श्री विष्णू बाळू मोरे,श्री अंकुश विनायक काळे,श्री.यशवंत मुकूंदराव वाघ,श्री अतुल नानासो व्यवहारे,श्री वसंत खंडू मोहोळकर,श्री भास्करराव सुभाष गुरगुडे,श्री मच्छिंद्र दशरथ अभंग,श्री राजेंद्र भिकोबा गायकवाड,श्री.अंबादास विठठल शिंगाडे,श्री.सुभाष वामनराव भोसले,श्री केशव विनायक दुर्गे,श्री.पांडुरंग मारुती गलांडे,श्री. बाजीराब जी. सुतार,कार्यकारी संचालक
सर्व सभासद बंधू, अधिकारी व कर्मचारी वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, हा कार्यक्रम
कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि.
महात्मा फुलेनगर(बिजवडी), ता. इंदापूर जि. पुणे येथे पार पडला, शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून, वेळोवेळी सॅनिटायझर चा वापर करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बाजीराव जी. सुतार यांनी केले, तर सुत्र संचालन शरदराव काळे यांनी केले तरआभार सुभाषराव भोसले यांनी मानले
टिप्पण्या