जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण येथे - कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना- पुणे जिल्हा कार्यध्यक्ष कडून वृक्षारोपण
-इंदापुर तालुक्यातील सुपुत्र - जिल्हाधिकारी *मा.राहुल जावीर साहेब IAS Collector ( On Working Assam Ghuvati ), शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष-राहुल शेठ गुंडेकर व कृषी क्षेत्रातील सर्व मित्र परिवार यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम काल दि.८ जुलै रोजी जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल , कालठण नं 1 येथे पार पडला - निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम पार पडला -
*जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर साहेबांनी या कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त करताना* - *अनुभवाने माणूस घडतो व तुम्ही स्वताला फसवाल पण आई-वडिलांना नाही कारण त्यांच्या सावली शिवाय जीवन घडत नाही व तसेच पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांचे संगोपनाची करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सभोवताली असणारे सजीव आणि निर्जीवांचे विश्व म्हणजेच पर्यावरण आहे, पर्यावरण वाचविले तर माणूस वाचणार आहे*.असे मत व्यक्त केले.प्रा. जयश्री गटकुळ , यांनी मा. राहुल गुंडेकर यांची मराठा सेवा संघ इंदापुर शहर अध्यक्ष आणि *सुमित कुलकर्णी* यांची
कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना-पुणे जिल्हाम्हणून निवड झल्याबद्दल सत्कार करण्यात आला, प्राचार्य राजश्री जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.*प्रा. भास्कर गटकूळ यानी जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर यांचा सन्मान केला जिजाऊ *इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्था सर्वांची आहे , येथे महिलांना समान आणि प्राधान्य दिले जाते व शैक्षणिक व सामाजिक कामात खुप अग्रेसर आहे असे मत व्यक्त केले . *शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल गुंडेकर* यांनी *प्रतेक सदस्य मध्ये एक अभ्यासू भुमिका व सामाजीक काम करण्याची जिद्द आहे व झाडे जपा * असे मत व्यक्त केले *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर शिंदे यांनी केले *फळे झाडे जगवा ते तुमच्या आयुष्यात गोडवा निर्माण करतील पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे .मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचा निसर्ग वाचवा याची युवकांनी भविष्यात दखल घेऊन कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे* असे मत वृक्षप्रेमी *सुमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले,*
शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी *युवा पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळाली तर युवक उत्तुंग शिखरावर जाऊन दीपस्तंभ ठरतो हे आज आपल्या समवेत जिल्हाधिकारी मा. राहुलजी जाविर यांनी दाखवून दिले आहे* असे मत व्यक्त केले. शौर्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी वृक्षारोपण केले.मयुर शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
टिप्पण्या