मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत हिंगणगाव व तरटगांव येथिल अपंग व घरकुल लाभार्थांना हिंगणगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप-अभिजीत तांबिले  इंदापुर:जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामधून हिंगणगाव व तरटगांव येथिल अपंग लाभार्थी व घरकुल लाभार्थी यांना हिंगणगाव येथे जिवन आवश्यक गोष्टींचे  वाटप करण्यात आले.यामध्ये आठ्ठावन लाभार्थ्यांनी लाभ घेतला.यावेळी काटी वडापुरी  जिल्हा परिषद  सदस्य आणि सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे चि.अभिजीत भैय्या तांबिले यांच्या व सरपंच रमेश देवकर यांच्या हस्ते करण्यात आले, गटातील साहित्य वाटपाची सुरवात हिंगणगाव येथून करण्यात आली. यावेळी हिंगणगावचे कर्तव्य दक्ष  सरपंच रमेश देवकर ,तरडगावचे सरपंच पोपट माने,सुरेश लावंड,किसन भांगे, गणेश शिंगाडे, गुलाबराव जगताप, ज्ञानदेव जगताप,निलकंठ आरडे, सुधीर बनसोडे, समाधान देवकर, नितीन यादव, प्रकाश कांबळे, बब्रूवान आरडे,ग्रामसेवक रामेश्वर  साठे  व इतर मान्यवर उपस्थित होते  मा.चि.अभिजित भैय्या तांबिले (जि प सदस्य) व मा.सरपंच यांचे हस्ते सोशिअल डिस्टनसिंग नियमा चे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर विचारमंथन ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांचा जयंती उत्सव साजरा इंदापूर :रयतेची कणव मनात ठेवून आदर्शवत राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची स्मृती आजच्या काळात जिवंत ठेवायची असेल तर सध्याच्या काळात माणूस बनून माणसांशी माणसांसारखे वागावे लागेल असे उदगार इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्राचे व्याख्याते डॉ . लक्ष्मण आसबे यांना व्यक्त केले        इंदापूर विचारमंथन ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला . याप्रसंगी इंदापूर शहरातील अॅब्युलन्स ड्रायव्हर व इंदापूर कोर्टातील वकीलांच्या कारकूनाना जीवनावश्यक वस्तूचे  किट वाटप तीस जणांना मान्यवंराच्या हस्ते करण्यात आले . तर इंद्रजित अनिकेत वाघ व धरमचंद  लोढा यांचा वाढदिवस हि छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला .               या प्रसंगी शहरातील धरमचंद लोढा, डॉ . लक्ष्मण आसबे , प्रा. कृष्णा ताटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे , अॅड . गिरीष शहा , इंदापूर विचारमंथन ग्रुपचे अॅडमिन उपनग...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

एकिकडे कोरोना चे संकट दुसरीकडे पाण्याचे संकट उजनी धरण मायनस मध्ये पाणी पातळी खालावली एकिकडे कोरोना चे संकट दुसरीकडे पाण्याचे संकट  उजनी धरण मायनस मध्ये पातळी खालावली  इंदापुर:महाराष्ट्र राज्यावर एकिकडे कोरोना चे संकट आ वासून उभा आसताना पाण्याचे नविन संकट उभा राहणार आसल्याची कुनकुन लागली आहे, पाण्याची पातळी खालावली आहे.आसताना ,खाली पाणी सोडण्यात यावी आशी मागणी वाढत आहे, आशी सर्वत्र चर्चा आहे.  पाऊस नाही….नाही ….म्हणत गतवर्षी उजनी धरण १११% म्हणजे १२३ टीएमसी झाले होते. पण आज त्यातील पाण्याचा उपयुक्त साठा संपल्याने उजनीने तळ गाठला असुन वरदायनी उजनी धरणाचा प्लस मधुन मायनसमध्ये (दि.१४) रात्री प्रवेश झाला आहे. गतवर्षी उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात प्लस मधुन मायनस गेला होता, तर यंदा मे महिन्याच्या मध्यात झाला आहे. मागील वर्षी १५ मे रोजी उजनी धरण उणे ३८ टक्के होते. तर पाणीसाठा ४३.१६ टीएमसी होता. त्या तुलनेत या वर्षी गुरूवार १५ मे रोजी धरणात अचल पाणीसाठा ६३.०० टीएमसी आहे.  पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उ...

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

बावडा ग्रामीण रुग्णालयाची इमारत गेल्या दोन वर्षापासून उदघाटनाच्या प्रतिकक्षेत,कोणत्याही डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक नाही-अंकिता पाटील       इंदापुर : तालुक्यातील बावडा येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींची पाहणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केली. ही इमारत गेल्या दोन वर्षापासून बांधून तयार असून ही या रुग्णालयात  सरकारने कोणतीही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व किंवा इतरांची नेमणूक केलेली नाही. काल दि 12 मे 2020 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रसंगी हा प्रश्न कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित करून हे  रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली होती. दि.13 मे रोजी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या इमारतीची पाहणी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच श्री. करण पाटील, उप सरपंच  निलेश घोगरे व बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. वाघमारे यांच्यासमवेत केली.             ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर नगरपालिकेचे काम लय भारी, गरजूंना जीवनावश्यक वस्तू चे किट घरपोहोच वाटप करी इंदापुर (  लक्ष्मी वैभव न्युज ,शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, व महाराष्ट्र  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत पत्रकार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच भुकेलेल्यांना अन्न दान करणे म्हणजे सर्वात मोठी समाजसेवा आहे.. इंदापूर शहरात कोरोनाच्या ल...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

गरजूंना व गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तू किट योग्यपणे वाटप करण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल इंदापूर नगरपरिषदेचे जाहिर आभार  -नारायण ढावरे,बाळासाहेब सरवदे  इंदापूर: शहरात कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरिब लोकांचे हाल होत होते . अशा परिस्थितीत  शहरातील दानशूर लोक देखील आपआपल्या परिने मदत करीत होते . पण हि मदत विशेषपणे प.पू.डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर नगर , आण्णा भाऊ साठे नगर , सिद्धार्थनगर , लोकमान्य नगर , रामोशी गल्ली , वडार गल्ली या भागात मदतीची गरजवंताना गरज असताना तोकडी मदत होत होती तर शासन केवळ गहू , तांदूळ या दोनच वस्तूचे वाटप करीत होते , अशा स्थितीत काय करावं म्हणून अॅड नारायण ढावरे  व सतत सामाजिक कार्यातअग्रेसर आसणारे सामाजिक कार्यकर्ते  बाळासाहेब सरवदे विचार करीत होते . त्याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना नुसार जीवीत व व्यक्तीगत स्वातंत्र्य दिले आहे . मूलभूत हक्काच्या अनुच्छेद २१नुसार अन्न हक्क ,जीवीत हक्क समावेश केला आहे व नगरपालिका जबाबदारी व कर्तव्य संविधान परिशिष्ठ १२व अनुच्छेद २४३ ब नुसार निश्चित केले आहे . तर महा नगरपालिका ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कोरोना मुळे सिमा बंदी केल्याने ४०० / ५०० पायी चालणारे गरजू लोकांना अन्न दान इंदापुर (  लक्ष्मी वैभव न्युज ,शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत पत्रकार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच भुकेलेल्यांना अन्न दान करणे म्हणजे सर्वात मोठी समाजसेवाआहे..सामाजिक कार्यात सतत  अग्रेसर आसणा-या ,गोरगरीब जनतेच्या कैवा...