मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

एकिकडे कोरोना चे संकट दुसरीकडे पाण्याचे संकट 
उजनी धरण मायनस मध्ये पातळी खालावली 
इंदापुर:महाराष्ट्र राज्यावर एकिकडे कोरोना चे संकट आ वासून उभा आसताना पाण्याचे नविन संकट उभा राहणार आसल्याची कुनकुन लागली आहे, पाण्याची पातळी खालावली आहे.आसताना ,खाली पाणी सोडण्यात यावी आशी मागणी वाढत आहे, आशी सर्वत्र चर्चा आहे. 
पाऊस नाही….नाही ….म्हणत गतवर्षी उजनी धरण १११% म्हणजे १२३ टीएमसी झाले होते. पण आज त्यातील पाण्याचा उपयुक्त साठा संपल्याने उजनीने तळ गाठला असुन वरदायनी उजनी धरणाचा प्लस मधुन मायनसमध्ये (दि.१४) रात्री प्रवेश झाला आहे.
गतवर्षी उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात प्लस मधुन मायनस गेला होता, तर यंदा मे महिन्याच्या मध्यात झाला आहे. मागील वर्षी १५ मे रोजी उजनी धरण उणे ३८ टक्के होते. तर पाणीसाठा ४३.१६ टीएमसी होता. त्या तुलनेत या वर्षी गुरूवार १५ मे रोजी धरणात अचल पाणीसाठा ६३.०० टीएमसी आहे.  पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नसला तरी सध्या मुख्य कालव्यातुन ३२०० क्युसेक तर दहिगाव उपसा सिंचन १०५ क्युसेक ने विसर्ग धरणातुन चालू आहे. त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  उजनी धरणाच्या १२३ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर ६ टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. कारण उजनी धरण १००% भरते त्यावेळी ११७ टीएमसी पाणी असते आणि १११% पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील ६३ टीएमसी पाणी संपले आहे.
उजनी धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने, व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो, तर हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय ही होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, अर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.
सध्या उजनी धरणातील  पाणीपातळी
*एकूण पाणीपातळी –   ४९०.९९० मीटर
*एकूण क्षेत्रफळ – १९६.८१ चौ. कि. मी.
*एकूण पाणीसाठा  – १७९४. ९३  दलघमी
*उपयुक्त  साठा   –   – (उणे)०७.८८ दलघमी
*एकुण पाणीसाठा  –   ६३.३८ टी.एम.सी.
*उपयुक्त साठा    –  – (उणे)०. २८ टी.एम.सी.
*टक्केवारी       –   – (उणे) ०.५२ टक्के
आशी माहिती आम्हाला मिळाली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...