इंदापुर :तालुक्यातील बावडा येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींची पाहणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केली. ही इमारत गेल्या दोन वर्षापासून बांधून तयार असून ही या रुग्णालयात सरकारने कोणतीही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व किंवा इतरांची नेमणूक केलेली नाही.
काल दि 12 मे 2020 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रसंगी हा प्रश्न कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित करून हे रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली होती. दि.13 मे रोजी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या इमारतीची पाहणी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच श्री. करण पाटील, उप सरपंच निलेश घोगरे व बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. वाघमारे यांच्यासमवेत केली.
सद्यस्थितीला बाहेरून अनेक कामगार लोक व इतर नागरिक इंदापूर तालुक्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या नियमानुसार त्यांना 14 दिवस Qquarantine (वॉरन्टीन्) करण्याची सुविधा आपण येथे उपलब्ध करू शकतो किंवा संशयित रुग्णांना किंवा बाधित रुग्णांना प्राथमिक उपचार देखील येथे होऊ शकते या दृष्टिकोनातून रुग्णालया लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे मतअंकिता हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
*****************************************
************विशेष सुचना ***********
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'शिवसृष्टी न्युज व लक्ष्मी वैभव न्युज' आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-संपादक
टिप्पण्या