इंदापुर ( लक्ष्मी वैभव न्युज ,शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत पत्रकार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच भुकेलेल्यांना अन्न दान करणे म्हणजे सर्वात मोठी समाजसेवाआहे..सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणा-या ,गोरगरीब जनतेच्या कैवारी, इंदापुर लायनेस क्लब अध्यक्षा. सौं.सायरा(भाभी) हमीद अात्तार व युवा क्रांती प्रतिष्ठान यांचे तर्फे जे पायी चालत जाणारे प्रवासी मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे येथून लॉकडॉऊनमध्ये अडकलेले कर्नाटक राज्यातील नागरिकांना अन्नाचे पाकिट ( भात व भाजी ) असे ४०० / ५०० जणांना वाटप केले. हे प्रवासी इंदापूर पुणे बायपास ते सरडेवाडी टोलनाका. अथर्व लॉन्ससरडेवाडी, हिंगणगांव ते टेंभुर्णीपर्यंत पायी चालणारे प्रवाशी यांना दिले. यावेळी माजी अध्यक्षा. सौं कल्पना भोर, उत्कर्षा नागपुरे आणि सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार व प्रशांत सिताप, अस्लम शेख , शुभम देवकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या वेळी सोशल डिस्टंनस चे काटेकोरपणे पालन केले, मास्क व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर केला जात होता. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार यांनी लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे व शिवसृष्टी न्युज चे संपादक धनंजय कळमकर या संपादक मंडळींशी बोलताना दिली.
टिप्पण्या