इंदापुर नगरपालिकेचे काम लय भारी, गरजूंना जीवनावश्यक वस्तू चे किट घरपोहोच वाटप करी
इंदापुर ( लक्ष्मी वैभव न्युज ,शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत पत्रकार, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच भुकेलेल्यांना अन्न दान करणे म्हणजे सर्वात मोठी समाजसेवा आहे..
इंदापूर शहरात कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरिब लोकांचे हाल होत होते . अशा परिस्थितीत शहरातील काही दानशूर लोक समाजसेवक देखील आपआपल्या परिने मदत करीत होते.पण गरजवंताना गरज असताना तोकडी मदत होत होती तर शासन केवळ गहू , तांदूळ या दोनच वस्तूचे वाटप करीत होते ,
अशा स्थितीत काय करावं म्हणून अॅड नारायण ढावरे बाळासाहेब सरवदे यांनी मा. मुख्याधिकारी
डॉ.प्रदिप ठेंगल यांचेकडे अर्ज दिला , त्यानंतर विचारमंथन ग्रुपचे मार्गदर्शक अरविंद वाघ यांचेशी चर्चा केली , तर मुख्याधिकारी डॉ.ठेंगल व भरतशेठ शहा यांचेशी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे , प्रा कृष्णा ताटे,भावी नगरसेवक दादा सोनवणे , आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे , वंचित आघाडीचे हनुमंत कांबळे ,संदीपान कडवळे, प्रा . अशोक मखरे , अनिल पवार व इतर मान्यवरांनी सकारात्मक चर्चा करुन जीवनावश्यक वस्तू किट योग्यपणे वाटप करण्याचा निर्णय घेतला ,त्या अगोदर अनेक नगरसेवकांना फोनद्वारे , समक्ष भेटून किट वाटपाची मागणी करा म्हणून विनंती केली होती मात्र एकाने हि धाडस दाखवले नाही ,
माणुसकीच्या नात्याने इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . प्रदिप ठेंगल ,इंदापुर च्या धडाकेबाज नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचे जाहीर आभार ...... तसेच वरील परिसरात नगरपालिकेचे हेड क्लार्क श्री .गजानन पुंडे , श्री .अशोकराव चिंचकर व इतर कामगारांनी प्रमाणिकपणे घरटूघर किट वाटपाचे काम केले आहे, नगरपालिकेच्या या कार्याला सलाम व सर्वाना घराबाहेर पडूनका, आसा संदेश दिला त्या सर्वांचे आभार
तसेच सर्व पत्रकार बांधवांचे जाहीर आभार वेळोवेळी आमच्या विनंतीस मान देऊन बातम्या दिल्या म्हणून मानण्यात आले आसल्याची माहिती अॅड,.नारायणराव ढावरे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांनी शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर व लक्ष्मी वैभव न्युज चे संपादक विलासराव गाढवे यांच्या शी बोलताना दिली.या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित या दरम्यान इंदापुर नगरपालिका कर्मचारी यांनी सोशल डिस्टंनस पाळला, मास्कचा वापर केला.शासनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
टिप्पण्या