मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर :रयतेची कणव मनात ठेवून आदर्शवत राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची स्मृती आजच्या काळात जिवंत ठेवायची असेल तर सध्याच्या काळात माणूस बनून माणसांशी माणसांसारखे वागावे लागेल असे उदगार इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्राचे व्याख्याते डॉ . लक्ष्मण आसबे यांना व्यक्त केले
       इंदापूर विचारमंथन ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला . याप्रसंगी इंदापूर शहरातील अॅब्युलन्स ड्रायव्हर व इंदापूर कोर्टातील वकीलांच्या कारकूनाना जीवनावश्यक वस्तूचे  किट वाटप तीस जणांना मान्यवंराच्या हस्ते करण्यात आले . तर इंद्रजित अनिकेत वाघ व धरमचंद  लोढा यांचा वाढदिवस हि छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला .
              या प्रसंगी शहरातील धरमचंद लोढा, डॉ . लक्ष्मण आसबे , प्रा. कृष्णा ताटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे , अॅड . गिरीष शहा , इंदापूर विचारमंथन ग्रुपचे अॅडमिन उपनगराध्यक्ष अरविंद वाघ , मराठा सेवा संघाचे सुनिल गलांडे ,नगरसेवक कैलास कदम , नगरसेवक अनिकेत वाघ , अॅड . विशाल चव्हाण ,प्रा . अशोकराव मखरे , आरपीआयचे जिल्हा सचिव संघटक शिवाजीराव मखरे, पिपल्स पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे , आरपीआयचे संदिपान कडवळे , वंचित बहुजन आघाडीचे हनुमंत कांबळे , हमीद आतार, कवि माऊली नाचण , मातंग आरपीआय आघाडीचे नितिन आरडे , राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे नगरसेवक दादा सोनवणे , माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे , राष्ट्रसेवादलाचे गफूरभाई सय्यद , बिभिषण लोखंडे , दिपक मगर , धनाजी सुर्वे , आरपीआयचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे , अॅड . नारायण ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते .
       डॉ .आसबे म्हणाले की , छत्रपती संभाजीराजांनी आयुष्याच्या  ३२ वर्षात १८७ लढाई केल्या , त्यामध्ये एक हि तह किंवा पराभव स्वीकारला नाही . अतिशय लढवय्य पणाने ,त्यागातून , कष्टातून स्वराज्य हाच धर्म मानून निष्ठेने स्वराज्य रक्षण केले . इतिहासाच्या पानापानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू , त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख जगात निर्माण झाली आहे तर छत्रपती संभाजीराजेची ओळख त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यांच्या त्यागातून व प्राणाहून प्रिय असणाऱ्या स्वराज्यासाठी दिलेल्या बलीदानातून निर्माण झाली .आजच्या काळात छत्रपतीच्या इतिहासातून आपण प्रेरणा घेवून गोरगरिबांच्या उध्दाराचे समाजकारण व राजकारण करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले .जीवनात कितीही वाईट वेळप्रसंग आला तरी त्यास तोंड देवून आलेल्या अनुभवातून पुढील मार्गक्रमण कसे करायचे याची शिकवण देणारा , धाडसाने लढण्याचे बळ व कुशल बौध्दीक क्षमता निर्माण करणारा मराठा इतिहासात आहे तेंव्हा इतिहासाची पाने वाचली पाहीजेत 
. त्याप्रमाणे आपले दैनिदींन वर्तन ठेवले पाहीजे तर संभाजीराजांचा अंत्यविधी करणाऱ्या बहुजन , मागासवर्गीय बांधवाना कधीच विसरता येणार नाही . स्वराज्याचे मावळे बनून पुन्हा समाज एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने छ . संभाजीराजांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहीजे , स्वाभिमान निर्माण करून स्वराज्य निर्माण करणे हेच आपले उद्दीष्ठ असले पाहीजे असे मत शिव व्याख्याते डॉ . लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले .
 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीआय कार्याध्यक्ष बारामती लोकसभा मतदार संघाचे बाळासाहेब सरवदे यांनी केले तर आभार इंदापूर विचारमंथन ग्रुपचे अॅडमिन अरविंद वाघ यांनी मानले .
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
----------- सुचना-----------माहितीसाठी-------
 कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'शिवसृष्टी न्युज व लक्ष्मी वैभव न्युज' आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-संपादक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...