आयुर्वेदाचार्य तथा आधुनिक धन्वंतरी आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने जडी-बुटी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंदापूर नगरपालिकेजवळील प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ येथील योगवर्गात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इंदापूरचे आयुर्वेदाचार्य मल्हारी घाडगे व रविंद्र परबत यांनी विविध औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष माहिती देत त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांविषयी मार्गदर्शन केले. गुळवेल, कोरफड, तुळस, विदारा, पारिजातक, तेजपत्र, कडुनिंब, पानफुटी, पुनर्नवा, शिसम, रुई, पिंपळ, कढीपत्ता आदी औषधी वनस्पतींचे विविध आजारांमध्ये होणारे उपयोग, त्यांचा योग्य वापर व सेवन करण्याच्या पद्धती याबाबत उपस्थितांना उपयुक्त माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना गुळवेल व कोरफडीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत गिड्डे, अशोक अनपट, काशिनाथ पारेकर, भालचंद्र भोसले, शरद झोळ, रामेश्वर साठे, बिभीषण खबाले व हमीद आतार यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या