इंदापूर:
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इंदापूर शहरात 'छत्रपती संभाजी युथ फाउंडेशन'च्या वतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, दि. १४ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता या ऐतिहासिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.शहरातील प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंद्रेश्वर चौक, पंधारा येथून ही मिरवणूक निघणार आहे. या सोहळ्यासाठी इंदापूर परिसरातील शिव-शंभू प्रेमी मोठ्या संख्येने एकत्र येणार असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भगव्या पताक्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
'छत्रपती संभाजी युथ फाउंडेशन'ने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. "ताठ होती मान, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा" या भावनेने इंदापूरकर या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या