मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर ते पुणे एसटीचा ‘ढाबा’ प्रवास: प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी प्रशासनाचे मात्र ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष!

इंदापूर (विशेष बातमी प्रतिनिधी) इंदापूर ते पुणे प्रवासादरम्यान एसटी महामंडळाच्या बस आता अधिकृत बसथांब्यांवर न थांबता चक्क 'बेकायदेशीर' हॉटेल आणि ढाब्यांवर थांबवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी एसटी आता चहा-पाणी आणि जेवणाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असून, यामागे काहीतरी 'दाल में काला' असल्याची चर्चा प्रवाशांमधून रंगली आहे.
अधिकृत बोर्डाचे नाटक कशासाठी?
 एका बाजूला अधिकृत बसथांब्याचे फलक लावून तिथेच गाड्या थांबवण्याचा दिखावा केला जातो, तर दुसरीकडे मात्र बस थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये वळवली जाते. हे कशाचे द्योतक आहे?

परवानगीचा घोळ काय?
या खासगी हॉटेल आणि ढाब्यांना एसटी बसेस थांबवण्याची अधिकृत परवानगी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे?
गाड्यांची मर्यादा किती? संबंधित ढाब्यावर दिवसाला नेमक्या किती बसेस थांबवण्याची परवानगी देण्यात आली आहे?
दरपत्रकाचे काय झाले? परवानगी देताना हॉटेल किंवा ढाबा चालकांना एसटी प्रशासनाने कोणतेही दरपत्रक (Rate Card) दिले होते का? 

एफडीए (FDA) सुस्त, हॉटेल चालक मालामाल!

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा गर्दीच्या वातावरणात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी दुप्पट ते तिप्पट दर मोजावे लागत आहेत. एका पाण्याच्या बाटलीवर किंवा चहाच्या कपावर एमआरपीपेक्षा अधिक दर आकारून ढाबा चालक कोट्यवधींची माया गोळा करत आहेत. 

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारावर अन्न व औषध प्रशासन (FDA) मात्र पूर्णपणे सुस्त बसले असून, प्रवाशांच्या आरोग्याशी आणि खिशाशी होणाऱ्या या खेळाकडे दुर्लक्ष करत आहे.

प्रवाशांचा सवाल: बस सोयीसाठी की गैरसोयीसाठी ?
"एसटी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की हॉटेल चालकांची तिजोरी भरण्यासाठी? एसटी प्रशासनाने तात्काळ या बेकायदेशीर थांब्यांवर कारवाई करून अधिकृत थांब्यांवरच बसेस थांबवाव्यात. -संतप्त प्रवासी
प्रवाशांचा हा संताप पाहता, एसटी महामंडळ यावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 अनधिकृत ढाब्यांवर एसटी थांबणे. प्रवाशांची आर्थिक लूट व अवाजवी वेळ वाया जाणे. तात्काळ कारवाई करून अधिकृत थांबे पूर्ववत सुरू करावेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...