इंदापूर:येथील महिलांसाठी उत्साहाची आणि आनंदाची पर्वणी घेऊन रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल आणि झी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने **'पैठणीचा महासंग्राम'** या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती रोटरीचे डिस्ट्रिक्ट ३१३१ चे लिटरसी डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी दिली आहे.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना भरघोस बक्षिसे आणि आकर्षक पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य यांची विशेष उपस्थिती.दिनांक व वेळ:गुरुवार, ९ एप्रिल २०२६, सायंकाळी ६:०० वाजता.या कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ व २, नगरपालिकेजवळ, इंदापूर (पुणे).हे असून
या कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे ,सचिव रो. आप्पासाहेब बंडगर,आणि सर्व सदस्य व संचालक मंडळाने केले आहे. या भव्य सोहळ्यासाठी सौजन्य लाभले आहे श्री. वसंतराव माळुंजकर (व्ही. डी. कन्सल्टंट, इंदापूर) यांचे.इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या 'महासंग्रामात' सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..
---
टिप्पण्या