मुख्य सामग्रीवर वगळा

उजनी धरणग्रस्तांचा मोठा विजय: पीपीपी तत्त्वावरील जमीन मोजणी शेतकऱ्यांनी रोखली; हर्षवर्धन पाटलांच्या मध्यस्थीनंतर अधिकारी परतले

इंदापूर:-राज्य शासनाच्या १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाचा (GR) आधार घेत, उजनी धरणातील संपादित जमिनी 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (PPP) अंतर्गत खाजगी उद्योजकांना देण्याच्या हालचालींना इंदापूर तालुक्यात मोठा विरोध झाला आहे. तरडगाव आणि हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रस्तावित जमिनीची मोजणी रोखून धरली. अखेर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मोजणी अधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शासनाने उजनी धरण क्षेत्रातील संपादित जमिनी पीपीपी तत्त्वावर बड्या उद्योगपतींना ४९ वर्षांच्या कराराने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या जमिनीवर अनेक धरणग्रस्त शेतकरी वर्षानुवर्षे आपली उपजीविका करत आहेत. 
आमच्या हक्काच्या जमिनी शासन खाजगी उद्योजकांच्या घशात घालत आहे. ज्या जमिनीवर आमचे पोट अवलंबून आहे, त्या जमिनी हिसकावून घेण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडू."

शासन निर्णय १७ जून २०१९ व ८ ऑक्टोबर २०२५ अन्वये ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे,
तरडगाव-हिंगणगाव परिसरात ठिय्या आंदोलन
आज सकाळी मोजणी अधिकारी आणि कर्मचारी तरडगाव व हिंगणगाव परिसरात जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. ही बातमी समजताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. आपल्या जमिनी जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध दर्शवला आणि काम थांबवण्यास भाग पाडले.

हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी,परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पाटील यांनी तत्काळ संबंधित मोजणी अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. "शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचवून कोणतीही मोजणी करू नका, धरणग्रस्तांच्या भावनांचा विचार व्हावा,"अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. हर्षवर्धन पाटील यांच्या फोननंतर आणि शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहून मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी न करताच माघार घेण्याचा निर्णय घेतला.मोजणी पथक माघारी फिरताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. "आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ," असा निर्धार यावेळी मा.किसन तात्या भांगे व उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन पाटील यांनी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...