मुख्य सामग्रीवर वगळा

*आदर्श शिक्षक श्री. नानासाहेब सानप सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व* वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन


*इंदापूर*: ज्ञानाची दीपशिखा पेटवणारे, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला घडवणारे,मूल्यांचे संस्कार रुजवणारे आदर्श शिक्षक जेव्हा अर्ध शतकाचा टप्पा गाठतात तेव्हा तो क्षण खरोखरच अभिमान आणि प्रेरणादायी ठरतो.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील एका खेडेगावात जन्मलेले सुपुत्र हे इंदापूर येथे सन १९९४ - ९५ या शैक्षणिक वर्षात इंदापूर येथील दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या भिमाई आश्रमशाळेत शिक्षकपदी रुजू झाले. गेली ३१ वर्षापासून अध्यापनाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक सलोखा देखील वाखाणण्याजोगा आहे. शिव, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने प्रेरित होऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वतः ला अविरतपणे झोकून दिले आहे.
सानप सरांनी दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि संत भगवान बाबा यांना आदर्श मानून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास प्रारंभ केला.सामाजिक बांधिलकी जपणारे सानप सर यांनी आपल्या वर्तणुकीतून व कार्यातून जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
स्पष्ट आणि सडेतोड स्वभावाने परिचित असणाऱ्या सानप सरांनी खांद्यावर पडलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे अल्पावधीतच माजी नगराध्यक्ष व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे तात्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तात्यांनी सरांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 
माहे - ऑगस्ट २०१७ साली मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार माझे वडील सानप सरांना इंदापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नेते भाई गोकुळशेठ शहा यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार, सध्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.अनेक मान्यवर व यावेळी दिवंगत मखरे तात्या, संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी, शिक्षक -शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक बाबतील सरांचे योगदान उत्तम राहिले आहे. त्यांच्या हातून शिक्षण घेऊन गेलेले संस्थेतील विद्यार्थी पुढे वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस खात्यात अधिकारी, आरटीओ, बँकेत अधिकारी, आयटी कंपनी सेवेत आहेत. तसेच काही विद्यार्थी उद्योजक तर प्रगतशील बागायतदार तसेच राजकीय क्षेत्रात देखील आघाडीवर आहेत.
सर उत्कृष्ट सूत्रसंचालक व प्रभावी वक्ते देखील आहे. सरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दिवंगत रत्नाकर मखरे तात्यांनी सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा व त्यांच्या जीवन पटाचा लेख सरांनी मखरे तात्या हयात असतानाच लिहिला. शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते शैक्षणिक , सामाजिक प्रगतीचा आलेख आपल्या लेखणीतून नानासाहेब सानप सरांनी लिहिला तो लेख दैनिक सकाळने प्रसिद्ध केला. तात्यांनी सरांच्या पाठीवर अनेकदा कौतुकाची थाप दिली.
तसेच संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) यांच्यावर देखील अप्रतिम लिखाण केलं. ॲड. राहुल मखरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या विषयावर त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख देखील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला. सरांनी उत्तम स्तंभलेखन देखील केले आहे .उत्तम बातमी लेखन सुद्धा करतात. त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या शाळेत घेतले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम त्याच लेखन करून ते सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे.त्यांच्या लेखणीतून शिक्षण संस्थेच्या कार्याचा नावलौकिक वाढविण्यात देखील सरांचा खारीचा वाटा राहिला आहे. हे नाकारता येणारं नाही.
आजचा दिवस हा सरांच्या अखंड परिश्रमाचा,शैक्षणिक सेवाभावाचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निस्वार्थी प्रेमाचा उत्सव आहे. ३१ वर्ष प्रत्यक्ष शिक्षणाच्या उन्नतीसाठी अर्पण केले आहे.
 कार्यकर्तृत्ववान आदर्श शिक्षक माझे वडील श्री. सानप सरांना ५० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा !🌹💐🎂
(दि.७/१२/२०२५)
*शब्दांकन: इंजि. रोहन सानप*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...