मुख्य सामग्रीवर वगळा

पालकांनो सजग व्हा ...!**जागृत व्हा..! दहावीच्या मार्क्सनी हुरळून जाऊ नकात...

चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनीअर कॉलेज 11वी 12वी ला अँड मिशन आजच का घ्यावे यासाठी हा लेख प्रपंच
काल नुकताच दहावीचा निकाल लागला,अनेकांना ९० ते १००% गुण मिळाले,तर काहींना अपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले...भरभरून मार्क्स ची उधळण मार्कलिस्ट वर दिसून आली....प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याने मिळविलेल्या गुणांचा सार्थ अभिमान वाटला असेल . ‌ तो वाटला हि पाहिजे 
पालकांनो सजग व्हा ...!*
*जागृत व्हा..! दहावीच्या मार्क्सनी हुरळून जाऊ नकात...!* .
पण हे मिळविलेले गुणांची आता आपण सत्यता पाहू यात..
एका मुलाला ४५६ गुण मिळाले अस आपण आता गृहीत धरू यात....म्हणजे त्याच्या गुणांची टक्केवारी ४५६*१००/५००=९१.२० गुणपत्रिकेवर आलेली असेल...हे झाले त्याचे बेस्ट ऑफ फईव चे गुण... म्हणजे त्याला ६ पैकी ५ विषयातील सर्वात जास्त असलेले गुण धरलेले...या सहा विषयात त्याला न कष्ट करता मिळालेले प्रॅक्टिकल चे आयते प्रत्येक विषयाचे २० गुण म्हणजे ते १२० गुण... म्हणजे ४५६-१२०=३३६ गुणांचीच लेखी परीक्षा दिलेली आहे..
आता प्रत्येक पेपरची आपण कठिण्यपातळी विचारात घेऊ यात...सर्व पेपर्स मध्ये तेथेच उतारा,तेथेच प्रश्न ,एका वाक्यात उत्तरे,गाळलेल्या जागा भरा असे ऑब्जेक्टीव्ह टाइप प्रश्न..!त्यात दीर्घ उत्तरे वगैरे खूप कमी ...
आता हेच ४५६ च्या ऐवजी त्या विद्यार्थ्यचे सर्व विषयाचे गुण घेऊ यात ...५२४ गुण घेऊ यात...५२४*१००/६००=८७.३३ ते गुण होतील..
आता आपण ५२४-१२०=४०४ गुण होतील..(१२० प्रॅक्टिकल चे आयते गुण, प्रत्येक विषयाचे २० प्रमाणे गुण) आता या ४०४ ची टक्केवारी आपण पाहू यात ४०४*१००/४८०=८४.१६ ℅ होतात...
बेस्ट ऑफ फाईव्ह एवढे आत्मघातकी गुण आहेत की यावर पालक म्हणून आपण विचार केला पाहिजे, या गुणांच्या आधारे अनेकांना लातूर ,कोटा,नांदेड अशा ठिकाणी जाण्याचे वेध लागले असतील,पण या खाजगी वर्गांना पाठविण्यापुर्वी आपणच आपल्या मुलांचे गुण तपासले पाहिजेत,जरी बोर्ड म्हणत असेल की सर्व परीक्षा आम्ही कॉपी मुक्त राबविली आहे,तरी काही ठिकाणी परिस्थिती वेगळी होती...आपल्याला त्या विषयात जायचे नाही..आपल्याला उद्याचा होणार खर्च पहायचा आहे..लातुर ,कोटा येथील खाजगी क्लासेस च्या जाहिराती पाहुन आपले पल्या या गुणांच्या आधारे या ठिकाणी जाण्याचा,प्रवेश घेण्याचा नक्की विचार करतील..पण पालक म्हणून आपण या सर्व गुणांची पडताळणी स्वतः करा मग ठरवा...आज लातूरला खाजगी क्लाससाठी पल्याला तेथे ठेवायचे म्हटले तर किमान रोजचा खर्च १४०० रु आहे...आणि तो किमान ५०० दिवस होणार आहे..(त्यात ट्युशन फी,शाळेची फी,होस्टेल, पुस्तके ,वह्या,जाणेयेणे व इतर किरकोळ खर्च यांचा समावेश आहे)
आजचा पाल्य तेथे शिकविणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता काय आहे? असलं काही पहात नाही,तो पहातोय की तेथील वातावरण,बिल्डिंग एखादया चित्रपटातील कॉलेज प्रमाणे आहे का..! बस झालं..आजच्या लेकरांना जाहिरातीतील चित्रांचे एवढं अनुकरण करायची सवय झाली आहे की ही पिढी वास्तव समजून घेयला तयारच नाही..समजा एखाद्या मुलाने नीट किंवा जेजेई साठी या बेस्ट ऑफ फाईव्ह च्या गुणांवर लातूर , कोटा किंवा अशा इतर महागड्या ट्युशन क्लास साठी प्रवेश घेतला आणि दोन वर्षात साधारण ८ ते ९ लाख घालविले आणि त्याला नीट ला किंवा इतर परीक्षेमध्ये ५०० च्या आत मार्क्स पडले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही,त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गावातच राहून उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन,युट्यूब किंवा नेट च्या मदतीने प्रॉपर अभ्यास केला तर एखाद्या महागड्या क्लासला जाऊन जेवढे मार्क्स पडतात त्यापेक्षा जास्त मार्क्स तो घरच खाऊन घेऊ शकतो हे ही एक सत्य आहे...या महागड्या क्लास ची फी देण्यापेक्षा चेतना इंटरनॅशनल स्कूल ला दोन वर्षात जेवढी बचत होते त्यातून आपण जरी मार्क्स नाहीत पडले तर एखाद्या चांगल्या कॉलेज मध्ये फी भरून प्रवेश घेऊ शकतो हे देखील एक सत्य आहे,आणि पालक १२ वी झाल्यावर मग म्हणतात असे केले असते तर बरे झाले असते...
पालकांनो आजच वरील सर्व गुणांचा विचार करा...निर्णय घेताना माझा हा लेख नक्की आपल्याला मदत करेल..याची मला खात्री आहे...आपली प्रतिक्रिया वाचायला किंवा ऐकला नक्की समाधान वाटेल..थोडं वास्तवदर्शी लिहिलं आहे..त्यामुळे प्रत्येकाच्याच पचनी पडेल असे नाही...पण आज त्याची गरज होती म्हणून हे शब्द मेंदूतून पाझरले...
   धन्यवाद आपलाच उदय देशपांडे विलास भोसलेसर सोमनाथ मानेसर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते