मुख्य सामग्रीवर वगळा

माळवाडीच्या सख्ख्या बहिणी या गावातून प्रथमच पोलीस झाल्या! माळवाडीचा उंचावला मानसन्मान !

 इंदापूर डॉ. संदेश शहा, इंदापूर उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नंबर दोन येथील दोन सख्या बहिणी पोलीस दलात सेवा बजावत आहेत. या दोघी बहिणी राष्ट्रीय खेळाडू असून देखील दोघींनी आपल्या कर्तृत्वावर पोलीस खात्यात प्रवेश मिळवून आपली प्रतिमा उजळवली व गावाचा मानसन्मान उंचावला.

लहू जाधव हे माळवाडी येथील शेतकरी असून त्यांची उजनी धरणासाठी पन्नास एकरहून जास्त जमीन गेली. ते उजनी धरणग्रस्त असून आठवी उत्तीर्ण तर त्यांची पत्नी सौ. संगीता ही दहावी उत्तीर्ण आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींची पहिल्यापासून पोलीस होण्याची लहू जाधव हे माळवाडी येथील शेतकरी असून त्यांची उजनी धरणासाठी पन्नास एकरहून जास्त जमीन गेली. ते उजनी धरणग्रस्त असून आठवी उत्तीर्ण तर त्यांची पत्नी सौ. संगीता ही दहावी उत्तीर्ण आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींची पहिल्यापासून पोलीस होण्याची इच्छा होती. त्यांना पालकांनी साथ दिली. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. 

दोन्ही मुलींना त्यांनी दत्तात्रय व्यवहारे यांच्या इंदापूर येथील ज्युडो कराटे अकॅडमीमध्ये घातले. त्यानंतर भूतानमध्ये झालेल्या स्पर्धेत काजलने लक्षवेधी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने ज्यूडो राज्यस्तरीय स्पर्धेत सिल्वर, कुराश नॅशनल स्पर्धेत ब्रांझ, हाफकिडो इंटरनॅशनल स्पर्धेत गोल्ड तसेच

बेल्टरेस्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून आपली कामगिरी उंचावली. दोन वर्षांपूर्वी तिची पोलीस खात्यात निवड झाली. ती आता पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यांतर्गत दिघी येथे सेवा करत आहे.

शिवानी ही सुद्धा उत्तम ज्युडो खेळाडू आहे. बेल्ट रेसलिंग राज्यस्तरीय स्पर्धेत तिने गोल्ड, ज्युडो राज्य स्तरीय स्पर्धेत तिने गोल्ड पदक संपादन केले. थोरली बहीण काजल प्रमाणेच पोलीस खात्यात जाण्याचे तिने निश्चित केले. दोघींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. जाधव यांनी त्यांना बारामती येथील सह्याद्री अकॅडमीमध्ये प्रवेश दिला. काजल हिची पोलीस दलात निवड झाली. तिच्या पावलावर पाऊल ठेवत शिवानी हिने देखील पोलीस बनण्यासाठी अपार कष्ट घेतले. आता शिवानी पोलीस भरती झाली.

सध्या तिचे मुंबई येथे प्रशिक्षण सुरू आहे. मध्यंतरी क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, ज्युडो कराटे अकॅडमीचे अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे, शहा हेल्थ क्लबचे भरतशेठ शहा, बाळासाहेब गुंडेकर, यांनी दोघींचा सत्कार केला.

विशेष म्हणजे दोघांचे प्राथमिक शिक्षण माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षण श्री नारायणदास रामदास हायस्कूल, महाविद्यालयीन शिक्षण इंदापूर महाविद्यालयात झाले. माळवाडी नंबर दोन या छोट्या गावात पोलीस आले तर लोक घाबरत होते. मात्र या गावच्या दोन्ही लेकी पोलीस झाल्याने या गावात लोकांना कौतुक वाटत आहे. आपले स्वप्न पूर्ण झाल्यामुळे दोघी बहिणी आनंदी आहेत, तर मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केल्याने आई वडील समाधानी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...