जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. कालठण नं.1 चा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के - डाॅ.जयश्री गटकुळ
इंदापूर तालुक्यातील कालठण क्रमांक एक येथील विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. कालठण नंबर=1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे या विद्यालयाचा इयत्ता बारावी चा शैक्षणिक वर्ष 2024/25 भरघोस निकाल शंभर टक्के लागला असून विश्व प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्ष डॉ.सौ. जयश्री गटकुळ, डॉ. भास्कर गटकुळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
प्रथम क्रमांक चव्हाण श्रुती नानासो हिला 90.83%
द्वितीय क्रमांक बनसोडे इरा किशोर 90.00%
तृतीय क्रमांक वाघमोडे पृथ्वीराज संजय 89.00% असे घवघवीत यश विद्यार्थ्यांनी संपादन केले असून शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी जपली आहे. संस्थेच्या सचिव राजश्री जगताप , संस्थेच्या उपाध्यक्ष विश्वबाला गटकुळ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या धनश्री पवार, उपप्राचार्य सागर उंबरे , अतुल बोंद्रे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
टिप्पण्या