*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थ्यांनीचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश.*
इंदापूर: *क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य ,अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर कुराश स्पर्धा*
या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये जवळपास 20 राज्यांमधून 940 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून
*प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीच्या,इतिहासात स्कूल गेममध्ये पहिले ब्रॉंझ मेडल पटकावले.14 वर्ष वयोगटातून
समृद्धी जाधव हिने -24kg वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ब्रांझ मेडल मिळवले.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संस्थेचे, अध्यक्ष मा.श्री.श्रीमंत ढोले उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले ,सचिव श्री. हर्षवर्धन खाडे , मुख्य सल्लागार श्री. प्रदिप गुरव , तसेच संस्थेचे प्रशासक व विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनींला क्रिडा विभाग प्रमुख, प्रशिक्षक श्री. शिवराज तलवारे , श्री.अविनाश कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
टिप्पण्या