मुख्य सामग्रीवर वगळा

दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच आमदार भरणे झाले नामदार !

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक विभाग खात्याचे कॅबिनेट मंत्री तथा इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी मंत्रालयात आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारला. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे आता नामदार झाले आहेत. यावेळी क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख, अल्ताफ कुरेशी, इरफान दिवटे, जमीर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केंद्र शासनाचा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेले पद्मश्री मुरलीधर पेटकर, द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे, गोळाफेक क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले सचिन खिल्लारी, शूटिंग क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान करून आपल्या खात्याच्या कामाचा शुभारंभ केला.
यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सर्व पक्षश्रेष्ठी, महायुतीचे पदाधिकारी यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासास निश्चित पात्र राहीन. दिलेल्या पदाचा वापर विश्वस्त वृत्तीने करून शासन व खात्याच्या सर्व योजनांचा फायदा लाभार्थ्यांना देण्यासाठी कटिबध्द आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघाचा मानसन्मान निश्चित उंचावला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंदापूर विधानसभा मतदार संघात सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येवून इतिहास घडविणारे इंदापूर चे आमदार आता नामदार झाले. त्याबद्दल कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आला. 
नामदार दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले,सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आपण काम केले. त्याचा फायदा निवडणुकीत झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळाल्याने आपण तमाम इंदापूरकर यांचा अत्यंत ऋणी आहे. आता राज्याची जबाबदारी आली असली तरी इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. इंदापूर तालुक्याचा शाश्वत पाणी प्रश्न, शेती पूरक उद्योग उभारणी, बेरोजगारीसह विविध प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नामदार दत्तात्रय भरणे यांना देण्यात यावे अशी मागणी प्रदेश सचिव इरफान शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कडे केली.
 दरम्यान नामदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारताच इंदापूर येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांस पेढे भरविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध गावात जल्लोष व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...