मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*परीक्षेतील यशस्वीतेसाठी ध्यानसाधनेला महत्व - सुशांत पाटील*

 - इंदापूर महाविद्यालयात आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ध्यानधारणाचे मार्गदर्शन     इंदापूर महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ध्यानधारणाचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिकाच्याद्वारे ध्यान साधना घेण्यात आली. यावेळी बोलताना आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक सुशांत पाटील यांनी ध्यान साधनेला आपल्या जीवनात अधिक महत्त्व असून विद्यार्थ्यांनी या ध्यान साधनेच्या माध्यमातून परीक्षेतील आपली यशस्विता वाढवावी असे मत व्यक्त केले.       राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.    उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी आपल्या मनोगतात जीवनात सकारात्मकता व आपल्यातील उत्साह कायम राहावा यासाठी ध्यान साधना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.     विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी ध्याना...

*भारत देशात प्रथम होमिओपॅथी औषधे वापरून आंबा निर्मिती करणारे अरण ( जिल्हा सोलापूर ) येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांचा कृषिरत्न पुरस्कार देवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार*

इंदापूर, डॉ. संदेश शहा. दिल्ली येथे कृषिरत्न पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्वीकारताना दत्तात्रय घाडगे. सोबत इतर मान्यवर. आंबा लागवडी मध्ये रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून नैसर्गिकरित्या आंब्याचे उत्पादन घेणारे भारता तील पहिले आंबा बागायतदार तसेच दोन व तीन किलोचा आंबा तयार करणारे अरण ( ता. माढा जिल्हा सोलापूर ) येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तसेच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते महेंद्रसिंह टीकैत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार देवून दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.   राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दिल्ली येथे नुकतीच जागतिक पर्यावरण परिषद संपन्न झाली. या परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विजयराज ढमाळ व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत होमिओपॅथिक पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेणारे देशातील पहिले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना एकम...

उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला : डॉ. रावसाहेब पाटील.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला. सोलापूरच्या औद्योगिक विश्वातील जयकुमार पाटील हे कोहिनूर हिरा होते असे प्रतिपादन पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ. रावसाहेब पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई शाखा सोलापूर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांच्या वतीने सोलापूरचे उद्योगपती जयकुमार कलगौंडा पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूरा तील उद्योग आणि व्यापार या विषयावर डॉ. रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.   डॉ. रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आंतरिक प्रेरणा महत्वाची असून त्यासाठी लागणारी दूरदृष्टी अनुभवातून समृद्ध होत असते. सचोटी, गुणवत्ता, विश्वासार्हता,परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास हे गुण यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असतात. बाजारपेठेचा आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा डोळे आणि कान उघडे ठेवून बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत हिशोबी आव्हाने स्वीकारली तर कोणतीही व्यक्ती उद्योगपती होऊ शकते असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्...

*इंदापूरच्या आश्रमशाळेत स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*( आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा .)* *इंदापूर* (दि.२९) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसगतिगृह ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची सन २००७ ची पहिली ,सन २०१० ची १२ वीची पहिली बॅच या दोन्ही बॅचचा संयुक्त स्नेहमेळावा संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात रविवारी (दि.२९) आयोजीत केला होता.तो उत्साहात संपन्न झाला. स्नेह मेळाव्यास अध्यक्ष म्हणून संस्थाप्रमुख शकुंतला मखरे ह्या लाभल्या होत्या. यावेळी सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.अध्यक्षा शकुंतला मखरे,कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरेंसह उपस्थित मान्यवर व गुरुजनांचा यथोचित सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विवि...

*चांगले काम करणाऱ्या वसतीगृहाचा राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा- संजय शिरसाट*

पुणे, दि.२८: राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील २५० क्षमतेच्या मुलींचे शासकीय वस्तीगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक असल्याचे सांगून चांगले काम करणाऱ्या वसतीगृहांचा राज्यातील इतर वसतीगृहांनी आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहआयुक्त प्रमोद जाधव, पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, गृहप्रमुख श्रीमती मीनाक्षी येमले, गृहपाल श्रीमती प्रमिला आमले आदींसह कर्मचारी व वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आपल्यासमोर विद्यार्थ्यांच्या हिताला कायम प्राधान्य असल्याचे सांगून त्यादृष्टीकोनातूच राज्यातील विविध शासकीय वसतिगृहांची पाहणी करत असल्याचे श्री. शिरसाट यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थिनींशी चर्चा करत वसतिगृहातील जेवण तसेच देण्यात येणारे शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था आदी सुविधांबाबत त्यांनी मुलींकडून माहिती जाणून घेतली. वसतीगृहात असलेली स्वच्छता व इतर कामकाजाबाबत मंत्री...

राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

इंदापूर:-आज सालाबादप्रमाणे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मुतिदीनानिमित्त सकाळी पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली व नंतर काल्याचे किर्तन झाले नंतर राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमास मा अॅड राहुलजी मखरे, मा भरतशेठजी शहा, मा.कैलास कदम, मा पांडूरंग तात्या शिंदे,मा विशाल दादा बोंद्रे, तसेच मा.अतुल शेटे पाटील,मा हमीदभाई आतार, मा अशोक नाना अनपट व सर्व उपस्थित मान्यवर समाज बांधव आपल्या सर्वांचे मनापासून आभार मा सुनिल देशमाने अध्यक्ष राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा समिती इंदापूर यांनी मानले आशी माहीती दमदार नेतृत्व शिवराज भिसे यांनी दिली, 

*सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरण्याची परवानगी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या नेतृत्वात मोठा विजय,*

इंदापूर, डॉ. संदेश शहा. महाराष्ट्र राज्यातील ज्या नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे, त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यकिय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैद्यक व्यावसायिक म्हणून व्याख्येत समावेश करून त्यांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकिय व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी प्रशासनातील सर्व विभागीय सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त व औषध निरीक्षक यांना परिपत्रक जारी केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियम १९०५ मधील २ ईई नुसार  सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांना घाऊक किंवा किरकोळ विक्रेते ऍलोपथिक औषधांची विक्री करू शकतात तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे देखील देण्याचा आदेश परिपत्रक व्दारे देण्यात आला आहे. त्यामुळे  सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांच्या लढ्यास यश आले आहे. यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी पाठपुरावा केल्यामुळे ह...

*रत्नाकर तात्यांच्या भिमाईआश्रमशाळेतआठवडे बाजारात बटाटे चाळीस, वांगी तीस तर गवारीने खाल्ला भाव जल्लोषपुर्ण वातावरणात खरेदी-विक्री*

इंदापूर- खरेदी-विक्रीतून मुलांना पैशांची देवाणघेवाण याचे व्यावहारिक ज्ञान व्हावे, यासाठी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आठवडे बाजाराचे शनिवारी (दि.२८) आयोजन केले होते. शैक्षणिक संकुलात भरलेल्या या बाजाराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल पालकांमधील जाणकार ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे खरेदी केला. विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या ,कडधान्य ,फळे,खाद्य पदार्थ आदी विक्रीस ठेवले होते.सकाळी ९:३० ते १२वा. या वेळेत हा बाजार खुला ठेवण्यात आला होता. बाजारातून ग्राहकांनी वस्तूचे मोलभाव करत घेतल्याने विक्रेत्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. बाजारास सचिव ॲड.समीर मखरे,संचालक अस्मिता मखरे आदींनी भेट दिली. त्यांनी रोख पैसे देऊन बाजारातील सामान खरेदी केले.त्यामुळे सहभागी विक्रेते विद्यार्थी भारावून गेले होते. या अनोख्या उपक्रमाचे अध्यक...