*इंदापूर* (दि.२९) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसगतिगृह ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची सन २००७ ची पहिली ,सन २०१० ची १२ वीची पहिली बॅच या दोन्ही बॅचचा संयुक्त स्नेहमेळावा संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात रविवारी (दि.२९) आयोजीत केला होता.तो उत्साहात संपन्न झाला.
स्नेह मेळाव्यास अध्यक्ष म्हणून संस्थाप्रमुख शकुंतला मखरे ह्या लाभल्या होत्या.
यावेळी सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.अध्यक्षा शकुंतला मखरे,कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरेंसह उपस्थित मान्यवर व गुरुजनांचा यथोचित सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते इंदापूर येथील आश्रमशाळेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे.
या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. रविवारी १२ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. शेषराव मोहिते आणि गणेश मांढरे व त्यांच्यासह सहकारी मित्रांनी हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गंमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सतीश कोल्हे, सविता गोफणे, अनिल ओहोळ, सुनील मिसाळ, नानासाहेब सानप, अनिता साळवे आदी गुरुजनांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रा.सोमनाथ माने, संतोष चोरमले, रवींद्र रोकडे,रणजीत गोसावी, अनिसा मुल्ला, लता सातपुते, निता भिंगारदिवे आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना शेषराव मोहिते, नितीन पाहुणे,डॉ. राहुल जाधव,रामदास मांढरे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मांढरे यांनी केले तर आभार शेषराव मोहिते यांनी मानले.माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सुरेश गेजगे,विष्णू कोडलकर, अरविंद जाधव,राहुल शिंदे,देविदास पाहुणे, भैरवनाथ पाहुणे,शनी अवघडे,भगवान गेजगे, बलभीम कुसळे, प्रताप चव्हाण, गणेश मारकड, अंकुश वाघमोडे नवनाथ दरवडे, रामदास मांढरे,अमोल साबळे, प्रकाश जाधव, आप्पा वाघमोडे,अजित जाधव, विजय जाधव, सूर्यकांत दडस, सिद्धार्थ मदने, अमोल लांडगे, प्रताप जाधव, मंगेश कोळेकर, राहुल शिंदे, चंद्रकांत दडस, ताई करे आदी विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते.
टिप्पण्या