*भारत देशात प्रथम होमिओपॅथी औषधे वापरून आंबा निर्मिती करणारे अरण ( जिल्हा सोलापूर ) येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांचा कृषिरत्न पुरस्कार देवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार*
आंबा लागवडी मध्ये रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून नैसर्गिकरित्या आंब्याचे उत्पादन घेणारे भारता तील पहिले आंबा बागायतदार तसेच दोन व तीन किलोचा आंबा तयार करणारे अरण ( ता. माढा जिल्हा सोलापूर ) येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तसेच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते महेंद्रसिंह टीकैत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कृषिरत्न पुरस्कार देवून दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दिल्ली येथे नुकतीच जागतिक पर्यावरण परिषद संपन्न झाली. या परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विजयराज ढमाळ व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत होमिओपॅथिक पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेणारे देशातील पहिले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांना एकमेव कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दत्तात्रय घाडगे यांच्या आंबा बागेत २० हजार
हजार झाडे.
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर श्री. घाडगे यांनी अरण येथील माळराना वरती आठ एकरा मध्ये दहा हजार आंब्याची झाडे लावली. त्यांच्याकडे आंब्याच्या एकूण १६ जाती आहेत. त्यांच्याकडे इतर फळ झाडे व पारंपारिक दहा हजार झाडे त्यांच्या बागेत आहेत. शेततळे, विहीर, बोर यांच्या माध्यमातून ठिबक सिंचन द्वारे झाडांना पाणी दिले जाते.गेली आठ वर्षापासून ते
बागेचे संगोपन करत आहेत.
होमिओपॅथी खते व फवारा.
रासायनिक खतांमुळे मानवी शरीराचे तसेच झाडाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे घाडगे यांनी दोन वर्षापासून आंब्याच्या बागेला पूर्णपणे होमिओपॅथी विद्राव्य खते ठिबक मधून देण्यास सुरुवात केली तसेच फवाऱ्या द्वारे हीच औषधे ते झाडांवर मारतात. त्यामुळे झाडे ताजी, टवटवीत दिसतात. तसेच आंब्यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ येत नसून आंबे चवीला अतिशय गोड लागतात. रासायनिक खताच्या तुलनेत ३० टक्के फक्त होमिओपॅथी औषधाला खर्च येतो.
रायचूर प्रयोगशाळेचे सर्टिफिकेट.
कुठल्याही फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये रासायनिक खत व फवाऱ्याचा अंश आहे का याची तपासणी करणारी भारतात एकमेव प्रयोगशाळा रायचूर येथे आहे. या प्रयोगशाळेने घाडगे यांच्या बागेतील आंब्याच्या दीडशे चाचण्या घेऊन त्यांच्या आंब्यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आंब्या पेक्षा घाडगे यांच्या आंब्याचा दर दीडपट असतो. तरी देखील ग्राहक मोठ्या आनंदाने आंबे खरेदी करतात.
शरद व सावता आंब्याची जगभर चर्चा.
श्री. घाडगे यांनी त्यांच्या बागेमध्ये शरद व सावता या दोन आंब्याच्या जाती शोधून काढून त्याचे पेटेंट देखील घेतले आहे. शरद आंबा हा साधारण तीन किलोचा तर सावता आंबा हा दोन किलोचा आहे. संपूर्ण भारतात एवढ्या वजनाचा आंबा कोठेही मिळत नाही. त्यामुळे देश परदेशातून देखील लोक त्यांच्या बागेतील आंबे पाहण्यासाठी तसेच याची रोपे घेण्यासाठी येत आहेत. याच शोधामुळे घाडगे यांना विविध पुरस्कार मिळत आहेत.
यासंदर्भात दत्तात्रय घाडगे म्हणाले, होमिओपॅथी हे शास्त्र केवळ मनुष्यांसाठी उपयुक्त नसून अखिल प्राणिमात्र, झाडे यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. महाविद्यालय पातळीवर देखील याचा सर्वांगीण अभ्यास तसेच संशोधन होणे गरजेचे आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मानवी आयुर्मान वाढविण्या साठी, नैसर्गिक शेतीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होमिओपॅथिक संशोधन केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे.
टिप्पण्या