*रत्नाकर तात्यांच्या भिमाईआश्रमशाळेतआठवडे बाजारात बटाटे चाळीस, वांगी तीस तर गवारीने खाल्ला भाव जल्लोषपुर्ण वातावरणात खरेदी-विक्री*
इंदापूर- खरेदी-विक्रीतून मुलांना पैशांची देवाणघेवाण याचे व्यावहारिक ज्ञान व्हावे,
यासाठी इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आठवडे बाजाराचे शनिवारी (दि.२८) आयोजन केले होते.
शैक्षणिक संकुलात भरलेल्या या बाजाराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या ,कडधान्य ,फळे,खाद्य पदार्थ आदी विक्रीस ठेवले होते.सकाळी ९:३० ते १२वा. या वेळेत हा बाजार खुला ठेवण्यात आला होता. बाजारातून ग्राहकांनी वस्तूचे मोलभाव करत घेतल्याने विक्रेत्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. बाजारास सचिव ॲड.समीर मखरे,संचालक अस्मिता मखरे आदींनी भेट दिली. त्यांनी रोख पैसे देऊन बाजारातील सामान खरेदी केले.त्यामुळे सहभागी विक्रेते विद्यार्थी भारावून गेले होते. या अनोख्या उपक्रमाचे अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी विक्रेते,ग्राहक,पालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
खरेदी-विक्री कशी केली जाते, पैशांची देवाण-घेवाण कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांचे गणित पक्के होते, असे संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी सांगितले.
टिप्पण्या