इंदापूर महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ध्यानधारणाचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिकाच्याद्वारे ध्यान साधना घेण्यात आली. यावेळी बोलताना आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक सुशांत पाटील यांनी ध्यान साधनेला आपल्या जीवनात अधिक महत्त्व असून विद्यार्थ्यांनी या ध्यान साधनेच्या माध्यमातून परीक्षेतील आपली यशस्विता वाढवावी असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी आपल्या मनोगतात जीवनात सकारात्मकता व आपल्यातील उत्साह कायम राहावा यासाठी ध्यान साधना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले.
यावेळी श्रीहरी गायकवाड ,संदीप झगडे आणि प्राध्यापिका कल्पना भोसले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका सुवर्णा जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय माने यांनी केले.आभार प्रा. सागर गुजराथी यांनी मानले.
टिप्पण्या